आता रेल्वेत चहा-कॉफीही महागणार!

0
14

रेल्वेत ७ रुपयांना मिळणारा १५०मिली चहा आता मिळणार १० रुपयांत. १५० मिली कॉफीच्या किमतीमध्येही सारखीच वाढ.

 

नवी दिल्ली, २० सप्टेंबर

भारतीय रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या चहा आणि कॉफीच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचे रेल्वे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. रेल्वे मंडळाने हे नवे बदल करण्याचे परिपत्रक देशातील सर्व रेल्वे विभागांना पाठवले आहे. यासोबतच भारतीय रेल्वेने भांड्यात चहा देण्याची पद्धतही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

चहाच्या पिशविसोबत मिळणारा १५० मिली कप चहाची किंमत ₹७ वरून ₹१० होणार आहे, तर झटपट कॉफी पावडर सोबत मिळणाऱ्या १५०मिली कॉफीच्या दरातही सारखीच वाढ करण्यात आली आहे. मात्र, तयार करून मिळणाऱ्या साधारण चहाची किंमत तेवढीच, म्हणजे ₹५ च असणार आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही दरवाढ ‘आयआरसिटीसी’ च्या प्रस्तावानुसार आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंडळाने मान्य केला असून, ही दरवाढ खूप कमी आहे. यासोबतच मंडळाने भांड्यात/ कपात (टी-पॉट) चहा देण्याच्या पद्धतीला बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. इंडियन एक्सप्रेस

याबरोबरच, गरजेनुसार परवाना फी कमी-जास्त करण्याचे आदेशही रेल्वे बोर्डाने क्षेत्रीय रेल्वे विभागांना परिपत्रकातून दिले आहे.

सध्या देशात जवळपास ३५० ट्रेनमधून ‘आयआरसिटीसी’द्वारे खाद्यसेवा पुरवली जाते. मात्र, राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये खाद्य सेवा आगाऊ असल्याने, ह्या दर बदलाचा त्यांवर परिणाम होणार नाही.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here