एपीएमसी मार्केटमध्ये सापडली अर्धवट जळलेली मतदान ओळखपत्रे

एपीएमसी मार्केटमध्ये अर्धवट जळालेले हजारो मतदार ओळखपत्र सापडल्याने खळबळ परिसरात खळबळ माजली आहे.

 

गोपाळ दंडगव्हाळे

कल्याण, १२ ऑक्टोबर

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये हजारो अर्धवट जळलेली मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ माजलीये. या कार्डांपैकी बहुतांशी कार्ड ही मुस्लिम मतदारांची असल्यानं तर्क-वितर्कांना उधाण आलंय.

कल्याण एपीएमसी मार्केट परिसर ४० एकरांचा असून त्याचा बराचसा भाग रिकामा आहे. या भागात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना आज एका पोत्यात मतदान ओळखपत्र आढळून आली. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्धवट जळालेल्या अवस्थेतली ही हजारो कार्ड्स गोविंदवाडी, दुधनाका, खडकपाडा अशा भागातली असून बहुतांशी कार्ड मुस्लिम मतदारांची आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यासाठी मतदान ओळखपत्र काढा, दुरुस्ती करा असे आवाहन सरकारकडून केलं जातंय. तर दुसरीकडे अशाप्रकारे मुस्लिम मतदारांची मतदान कार्ड अशाप्रकारे जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यानं तर्क-वितर्कांना उधाण आलंय. दरम्यान, ही कार्ड खरी आहेत की खोटी आहेत, याचाही तपास होणं गरजेचं आहे

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: