कोलकात्यात वैद्यकीय सुविधांसाठी ‘सायक्लोन-३०’ कार्यान्वित
कोलकात्यातील ‘व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन केंद्रा’त वैद्यकीय वापरासाठी ‘सायक्लोन-३०’ या सर्वात मोठ्या सायक्लोट्रॉन सुविधेचे परिचालन करण्यात आले आहे.
कोलकाता, १९ सप्टेंबर
येथील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन केंद्रात ‘सायक्लोन – ३०’ या सर्वात मोठ्या सायक्लोट्रॉनचे वैद्यकीय उपचारांसाठी परिचालन सुरू करण्यात आले आहे. हे सायक्लोट्रॉन वैद्यकीय वापरांसाठी व इतर उपचारांसाठी वापरण्यात येणार आहे.
सायक्लोट्रोनचा वापर कर्करोगाचे निदान व उपचारासाठी आणि रेडिओइसोटोप्स तयार करण्यासाठी केला जातो. हे सायक्लोट्रॉन कार्यान्वित केल्यानंतर, गेल्या आठवड्यात ‘३० एमईव्ही ऊर्जा किरण फॅराडे कप’पर्यंत पोहोचले होते. ‘सायक्लोन-३०’ मधून निघालेल्या किरणांचा वापर ‘१८एफ’ (फ्लुओरिन-१८ आयसोटोप) च्या निर्मितीसाठी करण्यात आला होता. सहाय्यक परमाणू प्रणाली आणि नियामक मंजुरीनंतर इथून पुढल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत नियमित उत्पादन सुरु होईल.
‘सायक्लोन-३०’ ची ही सुविधा संपूर्ण देशासाठी, विशेषत: पूर्व भारतासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. यामुळे रेडिओइसोटोप्स आणि संबंधित रेडिओ फार्मासिटीकल्स सहज उपलब्ध होतील. ‘गॅलियम-६८ आणि पॅलेडिअम-१०३’ या समस्थानिकांच्या (आयसोटोप) योग्य निर्मितीसाठी व ‘जर्मेनिअम-६८/गॅलियम-६८’ उत्पादयंत्रासाठी (जनरेटर) निर्यात क्षमता उपलब्ध करेल. या उपकरणाचा उपयोग स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि पोस्ट्रेट कर्करोगाच्या उपचारांसाठीही होणार आहे.
या ‘सायक्लोन-३०’ सुविधेमुळे भारतीय वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
◆◆◆