दिल्लीत सापडली २५४ मध्ययुगीन नाणी!
दिल्ली, १२ सप्टेंबर
सांस्कृतिक मंत्रालयाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिल्लीजवळील खडकी मशिदीच्या आवारात मध्ययुगीन काळातील २५४ तांब्याची नाणी सापडली आहेत. खडकी मशिदीचे संवर्धन कार्य सुरू असताना पुरातत्व विभागाला ही नाणी सापडली आहेत. ही मशीद खडकी गावच्या दक्षिण टोकाला असून, त्याकाळी ( इ. स.१३५१-८८) फिरोजशहा तुघलकचा प्रधान जुनान शाहने बांधली आहे. जुनानने बांधलेल्या सात मशिदींपैकी ही एक आहे.
मशिदीच्या संवर्धनाचे कार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडून खडकीत सुरू आहे. मशिदीच्या आवाराची स्वच्छता करताना संबंधित कर्मचाऱ्यांना तेथे २५४ मध्ययुगीन काळातील तांब्याच्या नाणी आढळून आल्या आहेत. पुरातत्व खात्याच्या विज्ञान विभागाकडून परीक्षण केल्यानंतर काही नाणी ही शेरशाह सूरी व त्याच्यानंतरच्या शासकांच्या काळातील असल्याचेही माहिती पडले आहे.
येथे खास बाब ही की, २००३ साली राबवण्यात आलेल्या संवर्धनाकार्याच्या वेळीही याच मशिदीच्या आवारातून ६३ नाणी आढळून आली होती. त्यानंतर दिल्ली विभागाने पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांना पुन्हा एकदा सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. तांत्रिक साहाय्याने या नाण्यांचे परीक्षण केले जाणार असून, नंतर तज्ज्ञांच्या मदतीने त्यांबद्दल अधिक माहिती प्राप्त केली जाणार आहे.
( संदर्भ : पत्र सूचना कार्यालय, दिल्ली )
भाषांतर : मराठी ब्रेन
◆◆◆