दिवाळीनिमित्त रिलायन्स जिओची ग्राहकांना आकर्षक भेट

दिवाळीच्या निमित्ताने रिलायन्स जिओची ग्राहकांना आकर्षक भेट. 

 

मराठी ब्रेन वृत्त,

मुंबई, २९ ऑक्टोबर

दिवाळीच्या निमित्ताने खास भेट म्हणून रिलायन्स जिओने आकर्षक ऑफर आणली आहे. दिवाळीच्या निमित्ताने जिओने एक ‘फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड’ आणले आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर खास भेट म्हणून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकीकडे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांसारख्या इ-कॉमर्स कंपन्यांनी आकर्षक ऑफर देने सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रिलायन्स जिओनेही त्यांची आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणले आहे. ग्राहकांची ही दिवाळी अजून खास बनावी यासाठी हे कार्ड ग्राहक त्यांच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. या ‘जिओफोन गिफ्ट कार्ड’ची किंमत ₹१०९५ इतकी आहे. रिलायंस डिजिटल स्टोअर्स किंवा अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन हे कार्ड खरेदी करता येऊ शकेल. या कार्डच्या माध्यमांतून ग्राहकांना अनेक सेवांचा मोफत लाभ घेता येणार आहे.

 

● काय आहे जिओची ही ऑफर? 

१. मान्सून हंगाम अंतर्गत रिलायन्स जिओकडून हे गिफ्ट कार्ड जारी करण्यात आले आहे.

२. या कार्डच्या मदतीने ग्राहक त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याची जुन्या ब्रँडच्या मोबाईलच्या मोबदल्यात जिओफोन घेऊ शकतील. आधी यासाठी ग्राहकांना ५०१ रुपये खर्चावे लागत होते. सोबतच ग्राहकांना या मोबदल्यात ६ जीबी वाढीव डेटा मिळणार आहे.

३. या गिफ्ट कार्डसोबत ५९४ रुपयांचे स्पेशल रिचार्ज देखील मिळणार आहे. या स्पेशल रिचार्जची वैधता सहा महिन्यांची असून अमर्यादित लोकल, रोमिंग आणि नॅशनल कॉलिंगची सेवाही यातून मिळेल.

४. या कार्डद्वारे दरदिवशी ५०० एमबी हाय-स्पीड 4जी डेटा मिळणार आहे. यातून ग्राहकांना सुमारे ९०जीबी डेटाचा फायदा होईल.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: