Site icon MarathiBrain.in

देशात ठिकठिकाणी स्थापित होणार ‘आयआयएस’

नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर 

 

सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर देशात वेगवेगळ्या ठिकाणी ‘भारतीय कौशल्य संस्था‘ ( Indian Institute of Skills ) स्थापन करण्याच्या निर्णयाला काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सुरुवातीला कानपूर, मुंबई आणि अहमदाबाद येथे ह्या संस्था सुरू होणार आहेत.

सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरणावर देशात कौशल्य संस्था उभारण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय फोटो स्रोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी’ (Public Private Partnership – PPP) धोरणावर आधारित देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय कौशल्य संस्था (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स- IIS) स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे. संस्था स्थापनेसाठी विविध ठिकाणांची निवड मागणी आणि उपलब्ध पायाभूत सुविधा पीपीपी तत्त्वातून करण्यात येतील. सुरूवातीला कानपूर, मुंबई आणि अहमदाबाद येथे या संस्था सुरू करण्यात येणार आहेत.

 

● आयआयएसचे प्रस्तावित फायदे :

१. आयआयएसच्या स्थापनेमुळे उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण, उपयोजित संशोधन-शिक्षण आणि उद्योगाशी प्रत्यक्ष आणि अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता वाढीस लागेल.

२. देशभरातील तरुणांना अत्यंत कुशल प्रशिक्षण मिळवण्याची संधी मिळेल आणि उद्योग व जागतिक क्षेत्रातील स्पर्धात्मकतेशी जोडणीचा त्यांना फायदा मिळेल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

३. खाजगी क्षेत्राची उद्यमशीलता आणि जमिनीच्या रुपात सरकारी भागीदारी यांची सांगड घालून कौशल्य, नैपुण्य आणि स्पर्धात्मकता असलेल्या नवीन संस्था या संकल्पनेतून तयार होतील.

 

(संदर्भ : पत्र सूचना कार्यालय)

◆◆◆

Exit mobile version