न्यायाधीश रंजन गोगोई भारताचे ४६वे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगोई यांची भारतासाचे ४६ वे सरन्यायाधीश (चीफ जस्टीस ऑफ इंडिया) म्हणून नियुक्ती.
नवी दिल्ली, १४ सप्टेंबर
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे काल भारताचे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर ते ३ ऑक्टोबरपासून पदभार सांभाळणार आहेत. न्यायाधीश गोगोईंचा कार्यकाळ ३ ऑक्टोबर २०१८ ते १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत असणार आहे.
● जस्टिस रंजन गोगोई यांच्याबद्दल :
रंजन गोगोई हे मूळचे आसामचे असून, त्यांचा १८ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री होते.
न्यायालयीन क्षेत्रात त्यांनी सन १९७८ साली सुरुवात केली. सर्वप्रथम ते गुवाहाटी उच्च न्यायालयात वकील म्हणून नियुक्त झाले. २८ फेब्रुवारी २०११ ला ते गुवाहटी उच्च न्यायालयाचे ( हायकोर्ट ) न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले.
त्यानंतर ९ सप्टेंबर २०१० रोजी न्यायाधीश (जस्टीस) गोगोई यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बदली झाली. तिथूनच ते मग १२ फेब्रुवारी २०११ रोजी मुख्य न्यायमूर्ती बनले. २३ एप्रिल २०१२ रोजी न्यायाधीश गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाचे (सुप्रीम कोर्ट) न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
● न्यायाधीश रंजन गोगोईंची कारकीर्द :
– न्यायाधीश गोगोई यांनी एका प्रकरणात न्यायालयाचा अवमान म्हणून माजी न्यायमूर्ती मार्केन्डेय काटजू यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. यातून त्यांची शिस्तबद्धता दिसून आली. इतिहासात पहिल्यांदाच असे घडले होते, की सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींना या पद्धतीने कोर्टात हजर व्हावे लागले होते. एबीपीमाझा
– यावर्षी १२ जानेवारीला, जेव्हा इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी खटले वाटपांवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेमध्ये न्यायाधीश रंजन गोगोई यांचाही समावेश होता.
विद्यमान सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी जस्टिस गोगोई यांच्या नावाची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केल्यानंत, ती राष्ट्रपतींनी काल मान्य केली आहे. याबाबतची माहिती काल न्यायमंडळाने देशाला दिली.
◆◆◆