पाकिस्तान अजूनही तसाच : इमन गंभीर

0
32

२०१४ मध्ये पेशावरच्या शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानच्या या  खोट्या आरोपावर चोख  प्रत्युत्तर दिले आहे.

 

वृत्तसंस्था,

न्यूयॉर्क, ३० सप्टेंबर

‘पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर काही चांगले बदल झाले असतील या अपेक्षेने आम्ही आलो होतो, मात्र पाकिस्ताच्या स्वभावात काहीही बदले झालेले नाही’, असे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिव इमन गंभीर यांनी जाहीररीत्या व्यक्त केले आहे. ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात संबोधित करीत होत्या. एकप्रकारे हे पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून सुनावलेले खडे बोलच आहेत.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७३ व्या अधिवेशनामध्ये  दिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिव इमन गंभीर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानने भारतावर केलेल्या शाब्दिक हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘पाकिस्तानमध्ये नवीन सरकार आल्यानंतर काही बदल होईल असे वाटले होते. मात्र पूर्वीच्या आणि आताच्या पाकिस्तानमध्ये काहीही बदल झालेला नाही. आम्ही नवीन पाकिस्तानला ऐकण्यासाठी आलो होतो, मात्र येथे येऊन कळले की पाकिस्तान तर तसाच आहे. पाकिस्तानच्या कार्यपद्धीमध्ये कोणताही बदल झाला नसून, पूर्वीसारखीच दहशतवाद्यांना थारा देणारी त्यांची शैली आहे.’

इमन पुढे म्हणाल्या की, ‘पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालण्यापेक्षा स्वत:च्या विकासाकडे लक्ष द्यावे. शेजारील देशावर हल्ला करण्यासाठी तिथे दहशतवादाची निर्मिती होते.’

पाकिस्तानने असा आरोप केला होता की, २०१४ मध्ये पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात होता. हा आरोपही यावेळी इनम यांनी फेटाळून लावला. त्या म्हणाल्या की, ‘पेशवरच्या शाळेवर झालेल्या हल्याचा भारताने निषेध केला होता. भारतीय संसद व भारतातील अनेक शाळांमध्ये मौनही राखले होते. आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून पाकिस्तान हल्ल्यात मृत्यूमुखी पडेलेल्या मुलांचा अपमानच करत आहे.’

काल शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले. दहशतवादाचे आव्हान शेजारी देशामुळे निर्माण झाले आहे. हा देश दहशतवाद पसरवण्यातच नव्हे, तर त्याच्यावर होणारे आरोपही फेटाळून लावण्यातही माहीर आहे, अशी बोचरी टीका स्वराज यांनी केली होती.

◆◆◆

 

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here