प्रसिद्ध लेखिका ‘कविता महाजन’ यांचे निधन

सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री कविता महाजन यांनी घेतला पुण्यातील चेलराम रुग्णालयात अखेरचा श्वास. 

 

पुणे, २७ सप्टेंबर

सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे आज पुण्याच्या चेलाराम रुग्णालयात न्यूमोनियाच्या आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्या ५१ वर्षांच्या होत्या.

सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांनी आज पुण्याच्या चेलाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

ब्र, भिन्न, कुहू अशा विभिन्न विषयांवरील कादंबरी लिखाणांनी नावारूपास आलेल्या प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांनी पुण्याच्या चेलराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्त्री अस्मितेचा हुंकार आपल्या लेखनातून मांडणारी हरहुन्नरी लेखिका अशी त्यांची ओळख होती. २००५ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘ब्र’ हा त्यांचा कथा संग्रह वाचकांना असिमीत वाचनांद देणारा ठरला आहे.  याशिवाय त्यांनी लिहिलेली भिन्न, कुहू, ग्राफिटी वॉल ह्या अतिशय गाजलेल्या पुस्तकही लिहिलेल्या आहेत. कविता महाजनांना त्यांच्या साहित्य लिखाणासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

कविता महाजन यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्येझाले व नंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि त्यानंतर औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. मराठी साहित्या त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते.

 

● कविता महाजन यांच्याविषयी: 
१. त्यांची ओळख लेखिका, कादंबरीकार , अनुवादक, अनेक सामाजिक चळवळींशी बांधिलकी ठेवणाऱ्या आणि कवितेतील नवनवीन प्रकार हाताळण्यास समर्थ असणार्या प्रतिभावंत कवयित्री आणि चित्रकार अशी आहे.

२. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी झाला होता.

३. कविता महाजन गेल्या दोन वर्षांपासून ‘एबीपी माझा’च्या ‘चालू वर्तमानकाळ’ आणि ‘घुमक्कडी’ या सदरांखाली नियमित ब्लॉग लेखनही करत होत्या.

४. आजारपणाने ग्रासले असतानाही त्यांची काम करण्याची धडपड सुरुच होती, त्यांच्या शेवटच्या फेसबुक पोस्टवरून तसे समजून येते.

● कविता महाजन यांना प्राप्त पुरस्कार:

१. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ‘उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मिती’चा राज्यस्तरीय पुरस्कार (२००८)
२. कवयित्री बहिणाई पुरस्कार (२००८)
३. साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी) (२०११)
४. ‘जोयनाचे रंग’ कथासंग्रहासाठी मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कार’ (२०१३)

जेष्ठ लेखिका व साहित्यिक कविता महाजन, या एका अल्पशा आजाराने धक्कादायकरित्या निघून गेल्याने वाचकांकडून व समाजमाध्यमांवर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

कविता महाजन यांना मराठी ब्रेन परिवाराकडून विनम्र अभिवादन!

 

◆◆◆

 

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना पाठवा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: