भयाण शांतता
कधीकधी भयाण शांतता भेदणं जड जातं
या अफाट शांततेत स्वतःला सावरणं जड जातं
ओळखीचे संदर्भ हरवले कि ओझं होतं
शांततेचं आणि शब्दांचंही
काळोख्या रात्री अपुर्व शांती विश्वात पसरलेली असते
पण मन मात्र काळ्या कभिन्न अंधारात बुडून आजारी पडु लागते
हातात घट्ट धरलेली रेती हळुहळु निसटून जाते
आणि शेवटी निसटतात तिच्या असण्याच्या खुणाही
निशब्द शांततेतील भयाण यातना सोसणं अवघड जातं
काठोकाठ भरलेलंही बघता बघता रितं होतं
चेहऱ्यावरील हास्यामागे लपवले जातात पाणावलेले डोळे
अन एकदिवस आपलेपणही धुसर होत जातं
क्षणविस्तीर्ण शांततेत कायमचा हरवतो अर्थ
मग परक्या भाषेसारखं भासतं सर्व निरर्थ
चांदणे टिपुर आभाळी सजलेले
पण व्याकुळ मन मात्र कोमेजलेले
वेळेचं गणित वेळेवर सोडवलं नाही की
राहुन जातं एक कोडं कधीही न सुटणारं
कालांतराने उरत नाही ओळखीचाही गंध
पण चंदन जाळले तरी दरवळत राहतोच ना सुंगध
चंदन जाळले तरी दरवळत राहतोच ना सुंगध
-पूनम गवांदे
poonamgawande40@gmail.com
twitter: @gawande_poonam