पीटीआय
भोपाळ, १७ डिसेंबर
मध्यप्रदेशचे १८वे मुख्यमंत्री म्हणून कमल नाथ यांनी पदभार हाती घेतल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश शासनाच्या शेतकरी कल्याण आणि कृषी विकास विभागातर्फे कर्जमाफीसंबंधीची फाईल मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे स्वाक्षरीसाठी आज सादर करण्यात आली होती. या फाईलवर सही करून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्वीकृतीनंतर विभागाचे मुख्य सचिव राजेश राजोरा यांनी कर्जमाफीचे आदेश जारी केले.
राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांमधून कर्ज घेतलेल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना अल्प मुदतीसाठी ₹२ लाखपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय मध्यप्रदेश शासनाने घेतला आहे, असे जाहीर झालेल्या आदेशात सांगण्यात आले आहे.
निवडणूक प्रचारांच्यावेळी काँग्रेसने ‘जर सत्तेवर आलो, तर १० दिवसांच्या आत कर्जमाफी देऊ’, असे आश्वासन दिले होते.
◆◆◆