मनसे नेते संदीप देशपांडे मंगळवारी ट्विटरकट्ट्यावर!

सर्वसामान्य व्यक्ती ते विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना #ट्विटरकट्टा वर Live Chat साठी आमंत्रित केले जाते. मंगळवार १८ सप्टेंबर रोजी ट्विटरकट्टा चे ४६ वे सत्र आयोजित करण्यात आले असून या ४६व्या सत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ट्विटरकट्टा चे आजवर ४५ सत्र झाली आहेत.

 

ट्विटरकट्टाचे स्वरूप

पारंपरिक माध्यमांसारखी खूप मोठी नियमावली व औपचारिकता न ठेवता, अगदी, साधा व सरळ, सर्वांना सहभागी होता येईल असा हा उपक्रम आहे.

ट्विटरवरील लोकांच्याच सूचनांनुसार, त्यांच्या ओळखीच्या किंवा संपर्कात असलेल्या मान्यवर व्यक्तींना, प्रासंगिकतेनुसार ट्विटरकट्टावर आमंत्रित केले जाते.

ट्विटरकरांना संवादातून काय अपेक्षित आहे, त्यांना काय उत्तरे अपेक्षित असतात याची पूर्वसूचना तेवढी आमंत्रित पाहुण्यांना दिलेली असते.

ट्विटरकट्टाच्या नियोजित तारखेच्या एक दोन दिवस आधी  ‘ट्विटरकट्टा’  खात्यावरून कट्ट्याची तारीख, वेळ नेटकऱ्यांना कळवली जाते.

कट्ट्याच्या वेळी निमंत्रित पाहुण्यांना काही प्रास्ताविक बोलायचं असेल तर ते ट्विट्सच्या माध्यमातून सुरुवातीला व्यक्त होतात व सहभागी ट्विटरकरांना त्यानंतर प्रश्न करण्याची मुभा असते.

सहसा ट्विटरकट्टाचा कालावधी हा एक तासांचा असतो, मात्र लोक सहभाग, प्रश्नांचा ओघ अथवा पाहुण्याकडे उपलब्ध वेळेनुसार त्यात वाढही केली जाते. वेळ, व्यस्तता अशा विविध बाबींच्या मर्यादेतसुद्धा सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावीत यासाठी आयोजकांचा प्रयत्न असतो.

ट्विटरकट्टा वर संवाद साधून गेलेले आजवरचे पाहुणे:-

१. आर.जे.शो शो शोनाली(रेडिओ जॅकी) २. मानसी परांजपे(प्रोड्युसर रेड fm, उद्योजिका) ३. निलिमा कुलकर्णी(पत्रकार, news18 लोकमत) ४. चिराग पाटील (अभिनेता) ५. कौशल इनामदार(संगीतकार) ६. हेमंत ढोमे (अभिनेता) ७. रसिका(शनाया) धबडगावकर(अभिनेत्री) ८. स्वप्निल जोशी(अभिनेता) ९. स्पृहा जोशी (अभिनेत्री) १०. तुळशीदास भोईटे(जेष्ठ पत्रकार) ११. सुबोध भावे (अभिनेता) १२. महेश म्हात्रे (जेष्ठ पत्रकार) १३. श्रुती मराठे (अभिनेत्री) १४. ज्ञानदा कदम(अँकर ABP माझा) १५. अमृता खानविलकर(अभिनेत्री) १६. पै. विजय चौधरी (ट्रिपल महाराष्ट्र केसरी) १७. संस्कृती बालगुडे (अभिनेत्री) १८. कल्याणी मित्रगोत्री( सेलेब्रिटी मॅनेजर) १९. तुषार खरे ( ट्विटरकर, उद्योजक) २०. राहुल खिचडी (पत्रकार ABP माझा) २१. स्वप्निल जोशी( अभिनेता) २२. सोनाली कुलकर्णी (सिनियर, अभिनेत्री) २३. सलिल कुलकर्णी (संगीतकार) २४. वृषाली यादव ( अँकर, जय महाराष्ट्र २६ ऑग१७) २५. बच्चू कडू (आमदार) २६. आकाश पगार(अध्यक्ष, विद्यार्थी कृती समिती) २७. सोनाली कुलकर्णी(अभिनेत्री-२ सप्टें१७) २८. रेणुका शहाणे( अभिनेत्री-१४ सप्टें१७) २९. दिलीप ठाकूर( चित्रपट समीक्षक) ३०. शैलजा जोगल (अँकर, जय महाराष्ट्र) ३१. श्रावणी ताम्हाणे (ट्विटरकर) ३२. सुरेश जोशी( जेष्ठ ट्विटरकर) ३३. रोहन जगताप (लेखक १जाने१८) ३४. नविनकुमार माळी( मोडीलिपी अभ्यासक) ३५. सत्यजित तांबे( युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष) ३६. सुनिल थोरात( ट्विटरकर, उद्योजक) ३७. हेमंत आठल्ये (ऍडमीन हॅशटॅग म, उद्योजक) ३८. डॉ.मुक्ता सिरसाटे(ट्विटरकर) ३९. सतेज पाटील( आमदार,कोल्हापूर) ४०. सई ताम्हणकर( अभिनेत्री) ४१. अनिल शिदोरे (मनसे नेते) ४२. प्रा.डॉ. हरी नरके(लेखक, ब्लॉगर, अभिजात मराठी अभ्यासक) ४३- क्षिती जोग( अभिनेत्री) ४४- किसनराव फणसे पाटील( ट्विटरकर, प्रगतशील शेतकरी, वारकरी) ४५- प्रसाद ओक (अभिनेता)

  • सहभागी कसे व्हाल?

ट्विटर हे सर्वांसाठी खुले असलेले एक सामाजिक माध्यम आहे, तसंच ट्विटरकट्टासुद्धा सर्वांसाठी खुले असलेलं एक अभिव्यक्तीचं व्यासपीठ आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त उपक्रमाच्या वेळी तुम्हाला तुमच्या ट्विटर खात्यात प्रवेश करून ‘#ट्विटरकट्टा’ हा टॅग वापरून ट्विटायचं आहे.

अधिक माहितीसाठी संलग्नित राहा @TweetKatta ‘ ट्विटरकट्टा’ या ट्विटर खात्यासह.

तुमचे मत, तुमच्या सूचना, तुमचे अभिप्राय यांचे स्वागत आहे. शिवाय, तुमच्या आवडीच्या लोकांना कट्ट्यावर आमंत्रित करायचं असेल किंवा उपक्रमात आम्हाला सहकार्य करायचं असेल तर नक्की कळवा.

ट्विटरकट्टाच्या ४६व्या सत्रात नक्की सहभाग नोंदवा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: