मासिक पाळी आणि त्याविषयीचे गैरसमज

सर्व महिलांना पाळी येते, मात्र यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणे बहुदा टाळले जाते. मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. समाजाने हे मान्य करायला हवे, की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर किंवा अर्थहीन गोष्टींवर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणे आवश्यक आहे.

मासिक पाळीबाबत खालीलप्रकारचे गैरमज समाजात पसरलेले असतात —

मासिक पाळी दर २८ दिवसांनीच यायला हवी

वस्तुस्थिती: पाळीचं चक्र हे प्रत्येक महिलेच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. २० दिवसांपासून तर ३५ दिवसांदरम्यान कधीही मासिक पाळी येऊ शकते. पिरेड्स येण्यात काही दिवस उशीर झाला, तर असं नाही की एखादी मुलगी गर्भवती असेल. जर पाळी येण्यास थोडाच उशीर झाला असेल तर घाबरण्याची गरज नाही.

मासिक पाळीदरम्यान सेक्स करू नये

वस्तुस्थिती: खूपजण पाळीदरम्यान आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं पसंत करत नाही. मात्र पाळी असताना सेक्स केल्याने आपल्याला आडकाठी / उबळपासून आराम मिळतो. संशोधकांच्या मते पाळीदरम्यान सेक्स केल्याने वेदना कमी होतात. प्रत्येक संशोधकाचे मत भिन्न आहेत, तरीपण माझ्या मते तसं करू नये.

३. मासिक पाळीमध्ये गर्भवती राहू शकत नाही

वस्तुस्थिती: हा समज चुकीचा आहे. आपण मासिक पाळीदरम्यान गर्भवती राहू शकता. ज्या महिलांचं मासिक चक्र २८ दिवसांहून कमीचं असतं, त्यांच्यात पाळीदरम्यान गर्भवती होण्याची शक्यता अधिक असते.

४. मासिक पाळीदरम्यान आंबट, तेल-मसालेयुक्त जेवण करू नये
वस्तुस्थिती: पाळीमध्ये उबळ आल्यास त्यांचा संबंध आंबट खाद्यपदार्थांसोबत अजिबात नाही. मसालेदार जेवणानं पोट खराब होऊ शकतं, पण त्याचा पाळीतील वेदनांवर काही परिणाम होतो असे नाही.

५. मासिक पाळीदरम्यान व्यायाम करू नये

वस्तुस्थिती: पाळीदरम्यानचा व्यायाम त्रासाला कमी करतो. कारण व्यायाम स्नायूंमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुधारतो, ज्यामुळं शरीराला आराम मिळतो. पण डॉक्टरच्या सल्ल्याने कुठले व्यायाम करावेत आणि कुठले करू नयेत ते ठरवावे.

६. पाळीमध्ये आराम करायला हवा

वस्तुस्थिती: मासिक पाळीमध्ये शरीरातून रक्तस्त्राव होतो, ज्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. एका दिवसात जवळपास चार चमचे रक्तस्त्राव होत असतो. महिला आपलं दैनिक काम आरामात करू शकतात.

७. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम

वस्तुस्थिती: महिला यावेळी ‘पीएमएस’ प्रक्रियेतून जात असतात. कारण जवळपास ८५ टक्के महिला याप्रकारच्या लक्षणांचा अनुभव घेतात.

८. पाळीतील रक्त सामान्य रक्तापेक्षा वेगळे असते

वस्तुस्थिती: मासिक पाळीतील रक्त हे इतर रक्तासारखं सामान्यच असतं. यात असामान्य असं काही नसतं.

९. मासिक पाळीच्या वेळी केस धुवू नये

वस्तुस्थिती: हा गैरसमज फार पूर्वीपासून पसरलेला आहे. अंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं रक्तस्त्राव कमजोर होतो, असा समज आहे. मात्र असं काहीच नाहीये. उलट मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची जास्त गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करू शकता.

१०. कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये

वस्तुस्थिती: अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वापर केला तर त्यांचं कौमार्य नष्ट होतं. पण याचा काहीही संबंध नसल्याचे संशोधक सांगतात.

मासिक पाळी संदर्भात कुठल्याही समस्या असल्यास जाणकार व संबंधित डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा. आपल्या मनाने कुठल्याही आैषधाचे सेवन करू नये.

● स्त्रियांच्या  गर्भाशयाच्या आजारावर डॉक्टर  गर्भाशयाची पिशवी  काढण्याचा सल्ला देतात.  गर्भाशय काढले कि अनेक आजारही सुरू होऊ शकतात. म्हणून काढण्याआधी संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधा.

अनियमित मासिक पाळीची काही लक्षणे : 
मासिक पाळी दरम्यान पोट दुखी , पांढरे लाल जास्त दिवस अंगावर जाणे व मासिक पाळी दरम्यान अशक्तपणा जाणवणे.

काही सामान्य घरगुती उपाय :

उपाय १ :-

४ उंबराची पाने
४ आशोकाची पाने
४ पिंपळ पाने
१० सिसम पान
२० तुळशीचे पान

हे सर्व एकत्र करा आणि  ५०० मिली पाण्यात टाकुन उकळून घ्या. ते नंतर काचेच्या जारमध्ये भरून ठेवा आणि रोज सकाळी-संध्याकाळी कोमट पाण्यासोबत घ्या.

उपाय २ :-
शतावरी पावडर १ चमच, चार चमचे गुळ, एक चमचा मेथी पावडर , चमचा  दुधातून किंवा कोमट पाण्यातून सकाळ- संध्याकाळी घ्या.

आहारात खारीक, खजुर, मनुका, अंजिर, सफरचंद, गाईच्या तुपाचा वापर करा.

व्यायाम :

अनुलोम-विलोम १० मिनिटे

कपालभाती १० मिनिटे

मेडिटेशन  १० मिनिटे किंवा

4 किमी पायी चालणे

अनेक माता भगीणींना वरील औषधांनी व व्यायामाने गर्भ पिशवी चा कॅन्सर सुद्धा नाहीसा झालेला आहे. असे सलग २१ दिवस करा, म्हणजे मग मासिक पाळी संदर्भात कुठलीही समस्या शिल्लक राहणार नाही.

आम्हाला लिहा writeto@marathibrain. com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: