रणनितीकार प्रशांत किशोर जेडीयूमध्ये!

पाटणा, १६ सप्टेंबर

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या विजयात वाटा असलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे.  म्हणजेच आजपासून प्रशांत किशोर जनता दल युनायटेड (जेडीयु) मध्ये आणि बिहार सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतील.

प्रशांत किशोर यांना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे निकटवर्तीयही मानले जाते. मात्र त्यांच्या या जेडीयूतीळ प्रत्यक्ष राजकीय सुरुवातीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या निर्णयानंतर प्रशांत किशोर यांना पक्षात नंबर दोनचे पद मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.

प्रशांत किशोर यांनी जेडीयूमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती ट्विटून (ट्विटरद्वारे) दिली होती.

या पक्षप्रवेशानंतर त्यांनी असेही म्हटले की, “जेडीयूचा प्रस्ताव मला गेल्या अनेक दिवसांपासून होता, मात्र आता प्रवेशाची योग्य वेळ आहे. सरकारमध्ये असो वा पक्षात, नितीशजी जी जबाबदारी सोपवतील ती मी योग्यरित्या पार पाडेल.”

 

 

● प्रशांत किशोर यांच्याबद्दल :,

१) निवडणुकांमध्ये आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमांतून प्रशांत किशोर यांनी देशातील विविध राजकीय पक्षांसाठी काम केले आहे.

२) २०१४च्या लोकसभा निवडणूकमध्ये त्यांनी मोदींसाठी काम केले होते.

३) ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आणि ‘अब की बार…’ सारख्या घोषणा हे प्रशांत किशोर यांच्या रणनितीचेच भाग आहेत.

४) बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांना एकत्र आणण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता.

५) पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींसाठीही काम केले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: