लवकरच व्हाट्सऍपचे तीन ‘नवे फीचर्स’

मराठी ब्रेन वृत्त

१९ ऑक्टोबर, २०१८

व्हाट्सऍप संभाषणात अधिक सहजता यावी आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून व्हाट्सऍप वापरात विविधता यावी यासाठी व्हाट्सऍप तीन नवी वैशिष्ट्ये लवकरच कार्यान्वित करणार आहे. यामध्ये बाह्य सेवांना व्हाट्सऍपसोबत जोडण्याचे फिचरही समाविष्ट आहे.

१.५ अब्ज वापरकर्ते असलेले व्हाट्सऍप लवकरच तीन नव्या बदलांसह वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये आढळणार आहे. वापरकर्त्यांच्या संभाषणात आणि त्यांना मिळणाऱ्या व्हाट्सऍप सुचनांमध्ये (नोटिफिकेशन्स) सुधारणा व्हावी म्हणून व्हाट्सऍप ह्या तीन बदलांवर सध्या काम करत आहे. यासंबंधीची माहिती डब्ल्यूएबीटाइंफो नावाच्या व्हाट्सऍपबद्दलच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या लोकप्रिय संकेतस्थळाने प्रकाशित केले आहे. संकेतस्थळाच्या माहितीनुसार, व्हाट्सऍप जोडलेले बाह्य खाते (लिंक्ड अकाउंट्स) या फिचरसोबतच वेकेशन आणि सायलेंट मोड अशा दोन बदलांवर कार्य करत आहे.

 

● काय आहेत व्हाट्सऍपचे तीन महत्त्वाचे बदल?

१) बाह्य सेवा संलग्नता (लिंक्ड एकाउंट्स):

 हे फिचर मुख्यत्वाने व्हाट्सऍप व्यवसाय (व्हाट्सऍप बिजनेस) च्या दृष्टिकोनातून तयार केले जात आहे. याद्वारे व्हाट्सऍप वापरकर्त्यांना त्यांच्या खात्याशी इतर बाह्य सेवांमध्ये असलेल्या खात्यांना जोडता येणार आहे. सुरुवातीला हा पर्याय इन्स्टाग्राम खात्यांसाठी असणार आहे. अर्थात, इन्स्टाग्राम ही व्हाट्सऍपशी जोडली जाणारी पहिली बाह्य सेवा ठरणार आहे. हे फिचर प्रोफाईल सेटिंगच्या अंतर्गत उपलब्ध असणार आहे. इन्स्टाग्राम खात्यावरून सुद्धा व्हाट्सऍप खाते संलग्न करता येणार आहे.

 

२) वेकेशन मोड

 या वैशिष्ट्यामुळे (फिचर) संग्रहित (अर्काईव) केलेले संभाषण (चॅट) नवीन संदेश आल्यावरही उघड किंवा अनअर्काईव होणार नाही. यामुळे कोणते संभाषण संग्रहित आहे आणि कोणते नवे आहे, हे वापरकर्त्यांना सहज लक्षात येईल. हा पर्याय व्हाट्सऍप सेटिंग्जमध्ये उपलब्ध असेल.

व्हाट्सऍप लवकरच कार्यान्वित करणार आहे तीन नवीन फिचर.  स्रोत: wabetainfo

 

३) सायलेंट मोड

संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित माहितीनुसार अँड्रॉइड वापरकर्ते निःशब्दीत (म्युटेड) केलेल्या संभाषणांसाठी व्हाट्सऍप बॅजला लपवू शकतील.

आतापर्यंत आपण बघत आलोत की, व्हाट्सऍपच्या  वाचलेल्या संदेशांची संख्या आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशनमधून दाखवली जात असते. मात्र सायलेंट मोड फिचरमुळे जे संपर्क/संभाषण निःशब्द(म्युट) केलेले असतात त्यातील न वाचलेल्या संदेशांची संख्या नोटिफिकेशनमध्ये दाखवली जाणार नाही.  यासाठी तुम्हाला विशेष सेटिंग करावी लागणार नाही, तर निःशब्दीत खात्यांना हे फिचर आपण होऊनच लागू होईल.

 

◆◆◆

 

जगभरातील विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: