सेंद्रिय शेती काळाची गरज!

0
105

       आजकाल आपण शेतामध्ये रासायनिक खतांवर आणि औषधांवर जास्त भर देतो त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो, जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते तसेच मातीचे मुल्यांकनही ढासळते आणि उत्पादनाचा दर घटतो.त्याचबरोबर रासायानिक खतांचा वापर करून घेतलेले उत्पन्न दुषीत आणि रसायनयुक्तच राहते.

     मागे झालेल्या एका सर्वेनुसार दिल्लीतील स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधामध्ये काही प्रमाणात प्राणघातक रसायने आढळून आली म्हणजेच आपण पुढच्या पिढीला सरळसरळ विषच देत आहोत.

          पूर्वीची माणसे शेतात शेणखताला जास्त महत्व देत होते त्यामुळे जमिनीची पोत राखली जात होती आणि पूर्वी आयुर्मानसुद्धा १०० वर्षे इतके होते पण आजकाल ते ६० वर्षावर येऊन पोहोचले आहे म्हणून आज रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि दीर्घकाळ जगण्यासाठी सेंद्रिय शेती हि काळाची गरज ठरत आहे.

 आता आपण सेंद्रिय शेतीबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात –

सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक घटक

१) बीज संस्कार

देशी गाईचे शेण  – ५ किलो

देशी गाईचे गोमुत्र – ३ लिटर

कळीचा चुना     – २५० ग्रॅम

पाणी           – १०० लिटर

देशी गाईचे दुध   – १ लिटर

वर दिलेले सर्व घटक एकत्र मिसळून रात्रभर भिजत घालावे व सकाळी व्यवस्थित ढवळावे नंतर जमीनीवर बिया पसरून हे मिश्रण त्यावर शिंपडावे व हलक्या हाताने चोळावे आणि बिया सावलीत सुकवाव्यात आणि नंतर ते बी पेरावे.(वरील मिश्रण बिया चांगल्या भिजतील याप्रमाणात घ्यावे )

 2) रबडी(स्लरी)

देशी गाईचे शेण  – १० किलो

देशी गाईचे गोमुत्र – ५ लिटर

बेसन पिठ – ४ किलो

सेंद्रिय गुळ – ५ किलो

खपरी पेंड – ५ किलो

देशी गाईचे तूप – २०० मिलि

दही – १ लिटर

पाणी – २०० लिटर

वरील सर्व घटक एकत्र करून प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ७ दिवस आंबवावे आणि दिवसातून २ वेळा काठीने चांगले ढवळावे. हे मिश्रण १ महिन्यासाठी व १ एकरासाठी वापरता येते.

क्रमश:

  -शंकर सदाशिव पिसे     (Shankarpisebcs111@gmail.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here