Site icon MarathiBrain.in

₹२००० ची नोट बंद होणार नाही!

 

₹२,००० ची नोट बंद करण्याचा केंद्र शासनाचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल राज्यसभेत दिली.

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच चलनात आलेली ₹२००० ची नोट रद्द करण्याचा शासनाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारकडून काल राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले. देशातील बहुतेक ठिकाणी दैनंदिन व्यवहारात दोनशे रुपयांचे नोट कित्येक दिवसांपासून नागरिकांच्या नजरेस पडत नसल्याने, ही नोट बंद होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांमध्ये सुरु होती. मात्र, शासनातफे देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

राज्यसभेच्या कालच्या प्रश्नोत्तरांच्या तासात “₹२००० ची नोट रद्द करण्याची सरकारची काही योजना आहे का?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर केंद्राने लेखी उत्तर देत असा कोणताही प्रस्ताव शासनदरबारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रिय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राज्यसभेत याबाबत स्पष्टीकरण दिले. “₹२००० ची नोट रद्द होणार नाही, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याचे कारण नाही”, असे ठाकूर म्हणाले.

₹२००० ची नोट बंद होणार नाही, त्यामुळे चिंतेचे काहीही कारण नाही, असे ठाकूर म्हणाले.

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत ५ टक्के विकास दर समाधानकारक : मुख्य आर्थिक सल्लागार

समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निशाद यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. नोटाबंदीनंतर ₹२००० ची नोट चलनात दाखल झाल्यामुळे काळ्या पैशाच्या प्रमाणात वाढ झाल्याने, ही नोट रद्द करुन शासन परत ₹१००० ची नोट चलनात आणत असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे, असे निशाद यांनी म्हटले होते.

 

◆◆◆

Exit mobile version