दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यास अमेरिकेकडून ५० लक्ष डॉलर्सचे बक्षीस

दहशतवादाच्या विरोधात भारताबरोबर उभं राहणार असल्याचे अमेरिकेचे पुन्हा एकदा जाहीर आश्वासन आहे. मुंबई हल्ल्यातील दोषींना पकडून देणाऱ्यास ५० लक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर.

 

वृत्तसंस्था, अमेरिका


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील ‘२६/११’ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाच्या विरोधात भारताबरोबर उभं राहणार असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले आहे. मुंबईवरील हल्ल्याच्या सुत्रधारांना पकडण्यास मदत करणाऱ्याला ५० लक्ष डॉलरचे बक्षीसही अमेरिकेने जाहीर केले आहे.

दहशतवादाच्या विरोधात अमेरिका भारताच्या सोबत राहणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

‘मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त अमेरिका भारतीयांसोबत आहे.  या हल्ल्यामध्ये ६ अमेरिका नागरिकांसोबत १६६ निर्दोष लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू देणार नाही किंवा यशाच्या जवळही जाऊ देणार नाही’, असे आश्वासक मत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहेत. काल मुंबईत झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला १० वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या जाहीर वक्तव्याआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी ‘२६/११’ चे सूत्रधार असलेल्या दाहशतवाद्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी पाकिस्तानची असल्याचे मत व्यक्त केले होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान असल्याचे पोम्पिओ म्हणाले होते,। ते पुढे  असेही म्हणाले की, ‘संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार मुंबईवरील हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे ही पाकिस्तानची मुख्य जबाबदारी आहे.’ मुंबई हल्ल्याच्या दशवर्षपूर्तीनिमित्त मी अमेरिका व सर्व अमेरिकी नागरिकांच्यावतीने मुंबईकरांना बळ मिळावे अशी भावना व्यक्त करतो, असे पोम्पिओ म्हणाले होते.

दरम्यान, ट्विटून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट तर स्पष्ट केलीच आहे, सोबतच मुंबई हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या बक्षिसातही अमेरिकेने वाढ केली आहे. ही वाढ ५० लक्ष डॉलर्स, म्हणजेच ३५ कोटी भारतीय रुपये इतकी करण्यात आली आहे.



◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: