मुंबई पोलिसांनी चुकीचं काम केल्याचे म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. तसेच, मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास करताना एफआयआर दाखल केली नसल्याचेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


सर्वोच्च न्यायालयाने आज सुशांत सिंह प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे (Central Bureau of Investigation) सोपवला आहे. यासंबंधीची निर्णय सुनावताना न्यायालयाने प्रथमदर्शनी मुंबई पोलिसांनी मर्यादित काम केले असून, कोणतेही चुकीचे काम केल्याचे आम्ही सुचवत नसल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. तसेच, मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास करताना एफआयआर दाखल केली नसल्याचेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. बिहार पोलिसांच्या टीमला तपााासणीसा ठीकरण्यात आलेला अडथळा टाळता आला असता, असेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.

प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने असेही म्हटले की, मुंबई पोलिसांचा बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याच्या निर्णय अयोग्य असून, यामुळे संशयाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मुंबई पोलिसांना टाळता आले असते. दरम्यान, प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी काही चुकीचे केले आहे  असे न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या पुराव्यावरून म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

वाचा | ‘मानसिक ताण, आत्महत्या आणि आयुष्य’

सोबतच, मुंबई पोलिसांनी घेतलेल्या निर्णयांना चुकीचे म्हटले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, तपासणी निष्पक्ष पध्दतीने होण्यासाठी दोन्ही राज्यांचे नियंत्रण नसणाऱ्या स्वतंत्र संस्थेकडे तपास देणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणाची तातडीने सुनावणी केल्याने देशभरातून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

 

सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: