शर्लिन चोपडाची राज व शिल्पाच्या विरोधात एफआयआर!

ब्रेनवृत्त | मुंबई


अश्लील चित्रफिती निर्मितीच्या कारणावरून चांगलाच अडकलेल्या राज कुंद्राची संकटे दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडाने तिची फसवणूक व मानसिक छळ केल्याच्या कारणावरून राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्या विरोधात गुरुवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

“राज कुंद्रा याने लैंगिक छळ, फसवणूक केल्याबद्दल व गुन्हेविषयक धमकी दिल्याबद्दल त्याच्या विरोधात मी एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली आहे”, असे शर्लिनने एएनआयला सांगितले. राज कुंद्रा व शिल्पा या जोडप्याने मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तसेच फसवणूक केल्याबद्दल शर्लिनने १४ तारखेलाच तक्रार नोंदवली आहे. 

शिल्पाच्या अडचणी वाढल्या; लखनऊमध्ये मायलेकींवर गुन्हा दाखल!

अभिनेत्री शर्लिन चोपडाने राज कुंद्राद्वारे अंडरवर्ल्डची धमकी दिल्याचाही दावा केला आहे. लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतर राज कुंद्रा अभिनेत्री/मॉडेल्सला संबंधित तक्रार मागे घेण्यास सांगतो नाहीतर अंडरवर्ल्डची धमकी देतो, असे शर्लिनचे म्हणणे आहे. कित्येक अभिनेत्रींचे पैसे न देण्याचा, रात्री कधीही अभिनेत्रींच्या घरी जाऊन जीविताची धमकी देण्याचा आरोपही कुंद्रावर लावण्यात आला आहे. 

 

सोबतच, शर्लिनने राज कुंद्राने रात्री उशिरा घरी येऊन लैंगिक छळ केल्याचाही आरोप केला आहे. २७ मार्च २०१९ रोजी राज कुंद्रा रात्री उशिरा माझ्या घरी आले होते आणि माझे लैगिक छळ केले. त्यांनंतर त्यांच्या दबावाखाली येऊन मी २९ मार्च रोजी एक फोटोशूट केला, असे शर्लिनने म्हटले आहे. (संदर्भ : लाईव्ह हिंदुस्थान) 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: