तब्बल तीन महिन्यांनी सई परतली सेटवर !

ब्रेनरंजन, मुंबई

मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कोहॉलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने  सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च चित्रीकरणाचा प्रवास सुरु करताना सई खूप उत्साहित होती.

सईने नव्याने सुरुवात करताना तिचे मनोगत व्यक्त केले आहे आणि दर्शक-चाहत्यांकडून शुभेच्छाही मागितल्या आहेत. सई म्हणाली, “पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत. एकीकडे थोडीशी भीती आणि चिंता दाटून आली असतानाच मन खूप उत्साहित झालेले आहे. सेटवर डॉक्टर आहेत. रूग्णवाहिकाही बोलवण्यात आलीय. सेटवर आल्याआल्या तापमान चेक करणे, सतत हात धूणे, सॅनिटायझर बाळगणे. अशा सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना सेटवर बाळगल्या जाताहेत. लोकांना टीव्हीवरचे तेचतेच एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा आशिर्वाद असू द्या.”

दिलेला शब्द पूर्ण करणाऱ्यांमधली सई ताम्हणकर आहे. तिची ही वचनबद्धता तिने ह्या अगोदरही दाखवून दिली आहे. बॉलीवूड चित्रपट ‘मीमी’च्या सेटवर अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही, टाळेबंदी होणार हे कळल्यावर दुखऱ्या पायासह सई मार्च महिन्यात एका रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाउन उघडल्यावर निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असलेली आपली बांधिलकी जपत सई ताम्हणकर चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here