जम्मू-काश्मीरमध्ये ६ महिन्यांत १०१ दहशतवाद्यांचा खात्मा !

पीटीआय, श्रीनगर


गेल्या ६ महिन्यांमध्ये तब्बल १०१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलाला यश आले आहे. सोबतच, १२५ दहशतवाद्यांची दुसरी यादी सुरक्षा दलांतर्फे तयार करण्यात आली असून, त्यांमध्ये २५ दहशतवादी हे विदेशातील असल्याची माहिती १५व्या मुख्य तुकडीचे नेतृत्त्व करणारे लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, देशाचे एकूण २९ सैनिक व लष्करी अधिकारी हुतात्मा झाले आहेत.

“काल सकाळी पिंजोरा येथे चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर खात्मा झालेल्या दशवाद्यांचा एकूण आकडा १०१ झाला आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत २९ सैनिक हुतात्मा झाले असून, या दरम्यान ११ नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत”, अशी माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी दिली.

मार्च महिन्यांमध्ये दहशतवाद्यांच्या खात्मा करण्याची मोहीम थोडी मंदावली होती, मात्र एप्रिलमध्ये या मोहिमेला वेग आला. एप्रिल, २०२० मध्ये एकूण २९ दहशतवादी मारले गेले, तर १५ दहशतवाद्यांचा खात्मा मे महिन्यात करण्यात आला. तर, १५ दहशतवाद्यांचा खात्मा जूनच्या सुरुवातीच्या आठ दिवसांमध्येच करण्यात आला.

जनरल राजू यांनी या यशाचे मुख्य श्रेय विविध संस्थांच्या कार्यात्मकतेला व स्थानिकांच्या सहकार्याला दिले आहे. “दहशतवाद्यांच्या विरोधात आम्हाला मिळालेले यश हे या मोहिमेत सहभागी असलेल्या विविध संस्थांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे आहे. तसेच, स्थानिक लोकांनी सुध्दा आम्ही या मोहीम पार पाडण्यासाठी योग्य सहकार्य केले आहे.”

तसेच, प्रतिकार दलासारखी (TRF : The Resistance Force) कोणतीही संघटना खोऱ्यात अस्तित्वात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दलाच्या अस्तित्वाबाबत  विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लेफ्टनंट जनरल राजू म्हणाले, “दि रेझिस्टंस फोर्स नावाची कोणतीही संघटना नसून, हे समाज    समाजमाध्यावरील एक गट आहे, जे खोऱ्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेेेचे श्रेय घेऊ इच्छिते. ते इलेक्ट्रॉनिक आत स्वरूपात असून, आम्ही त्याचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी योग्य पाऊले उचलत आहोत. माझ्यासाठी ते लष्कर-ए-तोयब आणि जैैश-ए-मोहम्मद या संघटनांची आरशातील प्रतिमा आहे.”

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: