फेब्रुवारीपर्यंत किमान ५०% लोकसंख्या असेल कोरोना संक्रमित !

देेशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किमान ५० टक्के लोक पुढील फेब्रुवारी महिन्यापर्यंत नवीन कोरोना विषाणूने (Novel Corona Virus) संक्रमित झालेले असतील, असा अंदाज केंद्र शासनाद्वारे गठीत अंदाज समितीने वर्तवला आहे.

 

वृत्तसंस्था, रायटर्स

ब्रेनवृत्त | मुंबई

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किमान ५० टक्के लोकसंख्या पुढील फेब्रुवारी महिन्यापर्यंत नवीन कोरोना विषाणूने (Novel Corona Virus) संक्रमित झालेली असेल, अशी माहिती केंद्र शासनाने ‘कोव्हिड-१९‘च्या भविष्यातील प्रादुर्भावाविषयी अंदाज वर्तविण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या एका सदस्याने सोमवारी दिली आहे.

भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ७.५५ मिलियन, म्हणजे ७५ लाखांच्यावर पोहचली असून, अमेरिकेनंतर भारत संक्रमणाच्या बाबतीत जगभरात दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, सप्टेंबरच्या मध्यात दरदिवशी ६१,३९०च्या सरासरीने आढळणाऱ्या नव्या कोरोना संक्रमित प्रकरणांनंतर आता दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्या हळूहळू कमी होत आहे.

आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक व केंद्र शासनाद्वारे गठीत कोरोना संक्रमणाविषयीच्या अंदाज समितीचे सदस्य असलेले मनींद्र अग्रवाल रायटर्स म्हणाले, “आमच्या गणितीय प्रतिमानाच्या अंदाजानुसार सद्या भारतात एकूण ३०% लोक कोरोना विषाणूूूने संक्रमित झाले आहेेेत आणि येत्या फेब्रुुुवारीपर्यंत ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत जाणार आहे.”

वाचा | ‘कोव्हिड-१९’चे मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी

दरम्यान, समितीचे सद्याच्या कोरोना विषाणूच्या संक्रमितांच्या संख्येबाबतचा हा अंदाज केंद्र शासनाद्वारे करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे. सेरो सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार सप्टेंबरपर्यंत भारतात फक्त १४% लोक कोरोना विषाणूपासून संक्रमित झाले होते. पण “सेरो सर्वेक्षणा अंतर्गत हाताळण्यात आलेल्या लोकसंख्येच्या आकारामुळे सेरो सर्वेक्षणातील नमुन्यांची अचूक आकडेवारी प्राप्त झाली नसेल”, असे अग्रवाल म्हणाले.

ब्रेनविश्लेषण | का होतेय दिल्लीतील सर्व जिल्ह्यांत ‘सिरो सर्वेक्षण’?

दुसरीकडे, विषाणूतज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या समितीची आकडेवारी पूर्णतः गणितीय प्रतिमानावर आधारित आहे. याविषयी सांगताना अग्रवाल म्हणतात, “ज्या कोरोना विषाणू बाधित प्रकरणांची नोंदच झाली नाही, अशांवर प्रामुख्याने भर देणारे विशिष्ट मॉडेल आम्ही तयार केले आहे. यामुळे आम्हाला संक्रमित रुग्णांचे नोंद झालेले व नोंद न झालेले, असे दोन गट करणे सहज शक्य झाले.”

दरम्यान, समितीने असेही म्हटले आहे की, जर लोकांनी योग्य काळजी घेतली नाही, तर त्यांनी वर्तवलेला फेब्रुवारी, २०२१ पर्यंतचा कोरोना विषाणू संक्रमणाचा अंदाज खरा ठरणार नाही. लोकांनी मास्क वापरले नाही व सामाजिक अंतराचे पालन केले नाही, तर एका महिन्यात कोरोना विषाणूने बाधित नव्या प्रकरणाची आकडेवारी २० लाखांच्या वरही जाऊ शकते.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: