पुढील १०-१२ दिवसांत सुरु होणार कोव्हॅक्सिनची बालकांवर चाचणी

भारत बायोटेकद्वारे देशातील २ ते १८ वर्षे वयोगटातील लोकसंख्येसाठी कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीच्या वैद्यकीय चाचणीचा (Clinical Trials) दुसरा व तिसरा टप्पा येत्या १०-१२ दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज एका पञकार परिषदेत ही माहिती दिली.

Read more

केजरीवाल यांचा शासनाला सावधतेचा इशारा : सिंगापूरमधील विषाणूमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता

सिंगापूरमध्ये कोव्हिड-१९ विषाणूचा नवा प्रकार (Variant)  आढळला असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विषाणूबाबत केंद्र शासनाला सावध होण्याचा इशारा दिला आहे. भारतातील कोरोना विषाणू आजाराच्या तिसऱ्या लाटेसाठी हा प्रकार कारणीभूत असू शकतो, त्यामुळे शासनाने आतापासूनच त्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

Read more

कोव्हिड-१९मुळे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांचे निधन!

भारतीय वैद्यकीय संघटनेचे (IMA : Indian Medical Association) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे काल रात्री उशिरा कोव्हिड-१९ मुळे निधन झाले. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे शारीरिक परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये संवातकावर (Ventilator) ठेवण्यात आले होते. काल रात्री सुमारे ११.३० वाजता अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालयाच्या अधिकृत निवेदनातून जाहीर झाले आहे. 

Read more

डीआरडीओची २-डिजी औषध देशाला समर्पित!

डीआरडीओच्या आण्विक औषधे व संलग्न विज्ञान संस्था (INMAS) व हैदराबादमधील डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे २-डिजी (2-deoxy-D-glucose) औषध विकसित केले

Read more

पॅलेस्टाईनच्या मागणीला भारताने दर्शवला पाठिंबा!

ब्रेनवृत्त । न्यूयॉर्क इस्रायल व पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर भारताने आपली भूमिका व्यक्त करताना पॅलेस्टाइनच्या द्विराष्ट्र सिद्धांताला पाठिंबा दिला आहे. तसेच,

Read more

कोव्हीशिल्डच्या दुसऱ्या मात्रेची आगाऊ नोंदणी वैध

कोव्हीशील्डच्या (Covishiled) दुसऱ्या मात्रेसाठीची आगाऊ ऑनलाईन नोंदणी वैध राहणार असून, ती कोव्हीन (CoWIN) व्यासपीठावरून रद्द केली जाणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल(रविवारी) सांगितले. कोव्हीन प्रणालीत काही आवश्यक बदल करण्यात आले असून, जर पहिल्या मात्रेनंतरचा कालावधी ८४ दिवसांहून कमी असेल, तर लसीची दुसरी टूक घेण्यासाठी कोव्हीनवर नोंदणी करता येणार नाही. 

Read more

गंगेत शव फेकण्यावर प्रतिबंध आणा : शासनाचे राज्यांना आदेश

गंगा नदीत शव फेकण्यावर प्रतिबंध आणण्यास आणि त्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे, तसेच त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करण्याचे आदेश संघशासनाने राज्यांना दिले आहेत. मृतकांचे शव अथवा अर्धवट जळालेले प्रेत गंगा आणि तिच्या सहाय्यक नद्यांमध्ये फेकून देणे सर्वात अनिष्ट आणि भयानक कृत्य असल्याचे शासनाने म्हटले आहे.

Read more

खासदार राजीव सातव यांचे विषाणू संक्रमणाने निधन !

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (आयएनसी) खासदार राजीव सातव यांचे (आज रविवारी) पूण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात केल्याच्या काही दिवसांनी सातव यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. 

Read more

तिबेटचे चीनला खडेबोल : नव्या धर्मगुरूंची निवड हा चीनचा हक्क नाही

तिबेटचे पुढील दलाई लामा म्हणजेच धर्मगुरू निवडण्यात चीनच्या शासनाची भूमिका असू शकत नाही, असे तिबेटी शासनाच्या पुढील निर्वासित अध्यक्षांनी आज म्हटले  आहे. विशेषकरून, चीनचे कम्युनिस्ट नेते धर्मावर विश्वास ठेवत नाहीत, तर तिबेटच्या अध्यात्मिक उत्तराधिकारीची निवड हा पूर्णपणे एक धार्मिक विषय आहे, असे पेन्पा शेरिंग (Penpa Tsering) म्हणाले. 

Read more

तृतीयपंथी समुदायासाठी विशेष लसीकरण राबवणारे आसाम पहिले राज्य

कोव्हिड -१९ लसीकरणांतर्गत तृतीयपंथी समुदायातील लोकांसाठी आसाम राज्यात स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवली जात आहे. असे करणारे आसाम हे देशातील पहिलेच राज्य आहे. या विशेष मोहिमेचा भाग म्हणून काल (शुक्रवारी) गुवाहाटीमध्ये तृतीयपंथी समुदायाच्या तीस सदस्यांना लस देण्यात  आली.

Read more