बिहारला मिळाले भाजपचे दोन उपमुख्यमंत्री, तर नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदी

कतिहार विधानसभा क्षेत्राचे चारवेळा आमदार असलेले तारकिशोर प्रसाद व बेत्तीहाचे चारवेळा आमदार असलेले रेणू देवी यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते भाजपचे आहेत.

 

ब्रेनवृत्त, पटना

जनता दल युनायटेड (जदयु) पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा व एकूण सातव्यांदा बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवनियुक्त शासनात  दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. यावेळी केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जयप्रकाश नड्डा उपस्थित होते. राज्यपाल फागु चौहान यांनी ही शपथ दिली.

नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) निवडणुकीत एकूण २४३ जागांपैकी १२५ जागा जिंकून बहुमत मिळवले. या आघाडीत भाजपने ७४ जागांसह स्पष्ट नेतृत्व दर्शवले, तर जदयुने (जेडीयु) ४३ जागांवर विजय मिळवला. २०१५मधील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जेडीयुच्या २८ कमी झाल्या आहेत.

वाचा | प्रचारक ठरवणे तुमचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खडसावलेला

● बिहारला मिळणार दोन उपमुख्यमंत्री

कतिहार विधानसभा क्षेत्राचे चारवेळा आमदार असलेले तारकिशोर प्रसाद व बेत्तीहाचे चारवेळा आमदार असलेले रेणू देवी यांच्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले आहे. दोन्ही नेते भाजपचे असून, रेणू देवी यांनी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

सोबतच, जदयुचे नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी व मेवालाल चौधरी यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदुस्थानी आवमी पक्षाचे अध्यक्ष जितनराम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन व विकासशील इंसान पक्षाचे मुकेश साहनी यांनीही बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

ब्रेनविश्लेषण | मध्यप्रदेश पोटनिवडणुकीतील २३% उमेदवार कोट्यधीश !

दुसरीकडे, कुमार यांचे सहकारी म्हणून गेल्या १५ वर्षांपासून उपमुख्यमंत्रीपदी असलेले सुशीलकुमार मोदी यांना यावेळी बदलण्यात आले आहे. अशी चर्चा आहे की, मोदी यांची राम विलास पासवान यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेचे खासदार म्हणून वर्णी लागणार आहे. सोबतच, केंद्रात मंत्रिपदी अथवा एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केल्या जाण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रीय जनता दल (राजद), वामपक्ष व कॉंग्रेस पक्षांनी शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आधीच नितीन कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: