भाजपच्या तिजोरीत सर्वाधिक निवडणूक निधी

0
16
भाजप ठरला इलेक्टोरल बॉण्डमधून सर्वाधिक निधी मिळवणारा पक्ष

२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी भाजप निवडणूक रोखेंतून सर्वाधिक  निवडणूक निधी प्राप्त करणारा पक्ष ठरला आहे.

 

नवी दिल्ली, ५ डिसेंबर

सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) २०१७-२०१८ या आर्थिक वर्षासाठी निवडणूक रोखेंतून (इलक्टोरल बॉण्ड) निधी मिळणारा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या तिजोरीत तब्बल २१० कोटींचा निवडणूक निधी जमा झाला असल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

भाजप ठरला इलेक्टोरल बॉण्डमधून सर्वाधिक निधी मिळवणारा पक्ष

निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांकडे निवडणूक निधी (इलेक्शन फंड) जमा व्हावा यासाठी शासनातर्फे निवडणूक रोखे (Electroral Bond) जारी केले जाते. या बॉण्डच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष भाजपने २०१७-१८ या वर्षासाठी सर्वात जास्त निधी जमवल्याची माहिती त्यांच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. भाजपने २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा पाहणी अहवाल (ऑडिट रिपोर्ट) निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. या अहवालानुसार भाजपकडे निवडणूक रोखेच्या माध्यमातून एकूण २१० कोटी २ हजार रुपये इतका निधी जमा झाला आहे. तर, मार्च २०१८ च्या अखेरपर्यंत रोखेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निवडणूक फंडात भाजपची भागीदारी ९४.५ टक्के इतकी आहे. अर्थात, निवडणूक रोखेंतून निधी प्राप्त करणारा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

स्रोत : टाइम्स ऑफ इंडिया

भाजपच्या तपासणी अहवालानुसार, २०१७-१८ या वर्षासाठी भाजपला १०२७ कोटी रुपयांचा निवडणूक निधी मिळाला होता. यातील ७५८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्यापैकी ५६७ कोटी रुपये पक्ष प्रचारासाठी खर्च करण्यात आले आहेत. २२ कोटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर, तर १४३ कोटी रुपये प्रशासकीय कामकाजावर खर्च झाले आहेत. Moneycontrol

काँग्रेसने अद्याप त्यांचा पाहणी अहवाल निवडणूक आयोगाला सादर केलेला नाहीये. तरीही, भाजपचा निधी पाहता काँग्रेसला १२ कोटींपेक्षा जास्त निधी जमा करता आला नसेल. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना निवडणूक रोखेतून काहीच प्राप्त न झाल्याचे त्यांच्या अहवालांत स्पष्ट झाले आहे.

कांद्याच्या पैशांचे मोदींना मनिऑर्डर !

राजकीय पक्षांना मिळणारा निधी हा योग्य मार्गाने मिळावा आणि त्यात पारदर्शकता यावी यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६ मध्ये निवडणूक रोखे (इलेक्ट्रोरल बॉण्ड) ची घोषणा केली होती. मार्च २०१८ मध्ये केंद्र शासनाने २२२ कोटी रुपयांचे बॉण्ड जारी केले होते. त्यातील सुमारे २१० कोटी रुपये भाजपाच्या तिजोरीत जमा झाले. या रोखेतून निधी जमा करणारा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी भाजपला १००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here