पवारांनी आत्मचिंतन करावे : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर , 28 जुलै

पक्षांतरसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकत असल्याच्या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. “कुणावर दबाव टाकून पक्षात घ्यावे अशी भाजपची स्थिती सध्यातरी नाही, उलट शरद पवारांनीच आपले नेते पक्ष का सोडताहेत, यावर आत्मचिंतन करावे”, असे फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची सत्ताधारी पक्षाने एसीबी चौकशी लावली असल्याने भितीपोटी त्यांनी राजीनामा दिल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये येण्यास नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला असे पवार म्हणाले होते. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भाजपतर्फे दबाव टाकला जात असल्याचा आरोप पवारांनी केला होता. हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. लोकशाहीवर आघात करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे.

पवारसाहेब काँग्रेससोबत असल्याची पंतप्रधानांना खंत !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले की, “भाजपची ताकद आता वाढली आहे. कुणाला पक्षात बोलावण्याची वेळ भाजपवर नाही. लोक आमच्याकडे येतात, त्यातील जे चांगले आहेत, लोकाभिमुख आहेत त्यांना आम्ही पक्षात नक्की घेऊ. मात्र दबावाचं राजकारण करण्याची भाजपला गरज नाही.”

हेही वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांचा या आठवड्यात राजीनामा?

सोबतच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र सगळ्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. ईडीची चौकशी सुरु असलेल्या नेत्यांना पक्षात घेतलं जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेे आहे.

 

◆◆◆

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: