व्यवसाय सुरू करायचंय? मग नक्की वाचा !

बेरोजगार आहात? स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार सुरू आहे? पण व्यवसाय काय करावा हे सुचत नाहीये? नवीन कल्पना शोधत आहात? मग हे नक्की वाचा. खास नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी.

 

ब्रेनसाहित्य | नवउद्योजकता

‘व्यवसाय’ म्हणजे मोठी जोखीम (Risk), व्यवसाय म्हणजे ‘२४×७ ची नोकरी’, हे आपण ऐकलेच असेल. खूप सारे नवीन व्यवसाय, नवीन स्टार्टअप्स चालू झालेले आपण पाहिले असतील. तसंच, ७०% नवीन व्यवसाय एका वर्षात बंद पडतात हेही आपण ऐकलं असेलच. नवीन व्यवसाय उभारताना धोका कमी करण्यासाठी, चांगली कल्पना शोधण्यासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी खालील काही मार्गदर्शक बाबी नक्कीच उपयोगी ठरतील.

१. व्यवसाय करायचा असेल, तर पहिल्यांदा ग्राहकाची गरज ओळखायला शिका. आपला ग्राहक कोण असावा हे ठरवा. त्यानुसार त्यांच्या गरजा, त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून घ्या. एकदा का तुम्हाला ग्राहकाच्या गरजा समजल्या की, त्या आपण कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करा.

२. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जी कल्पना सुचली असेल, त्याच कल्पनेवर आधारित व्यवसाय करणारे इतर लोक असू शकतात. त्यामुळे मार्केटमध्ये तुमचे स्पर्धक कोण कोण आहेत हे शोधा, त्यांच्या व्यवसायातल्या त्रुटी शोधा, त्यावर अभ्यास करा. त्या त्रुटींच्या मुळाशी जा.

३. इतरांच्या त्रुटी तुमच्या व्यवसायात नसल्या पाहिजेत. त्यामुळे त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्ही जर त्रुटी दूर केल्या, तर “ग्राहकाने तुमच्याकडे का यायचं?” या प्रश्नाचं ते उत्तर असेल. आणि हे उत्तर प्रत्येक व्यवसायात असायला पाहिजे.

४. व्यवसायातून आर्थिक उलाढाली कशा होणार आहेत, पैसे येणार किती आणि खर्च किती होणार याचा ताळेबंद करा. आर्थिक नियोजन अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करा. वायफळ खर्च कसे टाळता येतील यावर भर द्या. सीए, सीएस अथवा मेंटॉर यांचा सल्ला घेतल्यास उत्तम. लक्षात घ्या, कोणत्याही व्यवसायात पैसे वाचवणे हे पैसे मिळवण्यासारखे असते.

५. व्यवसाय सुरु करताना किमान पुढच्या पाच वर्षांचे ध्येय ठरवून आणि नियोजन करून पावले उचला. भविष्यात व्यवसायाच्या विस्तार कसा करायचा आहे, याचा विचार आणि योजना (Plan) तयार असणे उत्तम.

६. भविष्यात येऊ शकणारी संकटे, व्यवसायातील चढउतार याचा सविस्तर अभ्यास करून त्या संकटांवर मात करण्यासाठी तुमचे प्लॅन तयार ठेवा. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार ठेवा. अगदी व्यवसाय अयशस्वी झालाच, तर त्याचा पुनर्प्राप्ती आराखडाही (रिकव्हरी प्लॅन) तयार असायला हवा.

७. तुम्ही जो काही व्यवसाय करणार असाल त्यासंबंधी सर्व कायदेशीर बाबी समजून घ्यायला हव्यात. सर्व कायदेशीर बाबी तपासून, तुमची व्यवसाय संकल्पना, तुमची योजना, तुमचे पाठबळ आणि आर्थिक बाबी यावर आधारित एक मजबूत व्यवसाय प्रतिकृती (बिझनेस मॉडेल) तयार करा.

८. कोणताही व्यवसाय विपणनाशिवाय (Marketing) अपूर्णच असतो. तुम्ही केलेले व्यवसाय प्रतिकृती तोपर्यंत यशस्वी होत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचे विपणन ताकदीने करत नाही. ग्राहकांच्या गरजा भागवणारे बिझनेस मॉडेल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जबरदस्त विपणन शास्त्र हाती असणे खूप गरजेचे असते. मार्केटिंगवर लक्ष द्या आणि व्यवसाय मोठा करण्यासाठी उत्तम जाहिरात संकल्पना तयार करा.

९. वरील सर्व गोष्टी तुम्ही केल्या आहात किंवा करायला तयार आहात, तर तुम्ही प्रत्यक्षात व्यवसाय सुरु करायला हरकत नाही. इथे तुमचा जोखीम गुणक (Risk Factor) कमी झालेला असेल. तुमची रिस्क ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’मध्ये रूपांतरित झालेली असेल.

एकूणच, माझ्या अनुभवातून मी या पूर्वसूचना/टीप दिल्या आहेत. काहींचे अनुभव कदाचित यापेक्षा वेगळे असू शकतील, तरी तुम्ही व्यवसाय करताना सखोल अभ्यास करावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे. या टिप्स फायदेशीर ठरल्या, तर नक्की कळवा. शुभेच्छा!

 

लेख : दिग्विजय विभुते 
ट्विटर : @Digvijay_004
ई-पत्ता : digvijayjvibhute@gmail.com

(लेखक अभियंता असून नवउद्योजकता व व्यवसाय  क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

◆◆◆

(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

Join @marathibraincom

लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !

 

अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: