चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका : मंत्री नवाब मलिक

ब्रेनवृत्त । मुंबई


राज्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना खिशात ठेवण्याचे वक्तव्य केल्यानंतर नवाब मलिक यांनी पाटील यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या खिशातले गुपित लोकांसमोर आणण्यासाठी मला तुमच्या खिशात टाका, असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.  

काल (शनिवारी) माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एका प्रश्नावर नवाब मलिकांसारख्या नेत्यांना खिशात ठेवतो असे म्हटले. त्या वक्तव्याच्या आधारावरून नवाब मलिक यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. एका ट्विटमध्ये TV९ डिजिटलच्या व्हिडीओचा संदर्भ देत मलिक यांनी पाटील यांच्या खिशात जाणे का आवश्यक आहे व तिथे गेल्यानंतर ते काय करतील, याविषयी सांगितले आहे. 

हेही वाचा । राणेंचा जामीन ही शासनाला अजून एक चपराक : चंद्रकांत पाटील

मंत्री नवाब मलिक ट्विटतात, “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका. (1/2)”

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: