वीरपुत्र हरवला; चॉपर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांसह 13 जणांचे निधन!
मराठीब्रेन ऑनलाईन
ब्रेनवृत्त | कुनूर
देशाच्या संरक्षण दलांचे प्रमुख (CDS) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व लष्करातील 11 अधिकाऱ्यांचे तामिळनाडूतील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर (IAF Helicopter) कोसळल्याने निधन झाले. भारतीय हवाई दलाच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरने जनरल बिपिन रावत आणि इतर सर्व कोईंबटुरहून वेलिंगटन येथील डिफेन्स स्टाफ कॉलेजकडे निघाले होते. दरम्यान, तामिळनाडूच्या निलगिरी हिल्स जिल्ह्यातील कुन्नर परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात घडून आला झाला.
सीडीएस बिपिन रावत आणि सहकारी जात असलेल्या हेलिकॉप्टरच्या कोसळण्याच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह सैन्यदलातील जवानांनी तातडीने शोध व मदतमोहिम सुरु केली गेली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधुन एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यांपैकी संरक्षण दलाचे प्रमुख, त्यांच्या पत्नी यांसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाले. दुर्घटनेनंतर तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात संरक्षण प्रमुखांवर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा | लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख !
> कोण होते सीडीएस बिपीन रावत?
– बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हे देखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते.
– त्यांचे बालपण सैनिकांमध्ये गेले आणि त्यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट एडवर्ड स्कूल, शिमला येथे झाले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले.
– त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.
– बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळाले. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5 व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आले. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला.
– गोरखामध्ये असताना त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर म्हणून काम केले.
हेही वाचा | चॉपर घोटाळ्यातील कंपनीवरील बंदी उठवली, अटींसह व्यवहारांना परवानगी!
> लष्करप्रमुखापासून संरक्षण दलांच्या प्रमुखपदाचा प्रवास
बिपीन रावत यांची लष्करप्रमुख करण्यात आली. त्यांना 31 डिसेंबर 2016 रोजी दलबीर सिंग सुहाग यांचा उत्तराधिकारी बनवण्यात आले. हे पद बिपिन रावत यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पद आहे. या पदावर आल्यानंतर त्यांना संपूर्ण भारतात विशेष ओळख मिळाली आणि ते भारतीय लष्कराचे 27 वे प्रमुख बनले. 1 जानेवारी 2017 रोजी त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली.
बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि देशातील पहिले सर्व संरक्षण दलांचे प्रमुख, म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय सीडीएस अधिकारी बनलेली बिपिन रावत हे पहिली व्यक्ती आहेत. सीडीएस लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयासाठी काम करतात आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतात.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in