सीआयएसएफने सैनिकांना मागितली समाजमाध्यमांवरील खात्यांची माहिती

वृत्तसंस्था | नवी दिल्ली

केंद्र शासनाने नुकताच एक नवा आदेश काढला असून, या आदेशानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआईएसएफ) जवानांना विविध समाज माध्यमांवर (Social Media) असलेल्या खात्यांची माहिती शासनाला सादर करावी लागणार आहे. त्यामुळे देशातील तब्बल १.६२ लाख सीआयएसएफ जवानांना समाज माध्यमांसंबंधीची माहिती शासनाला द्यावी लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब आदी. खात्यांची माहिती द्यावी लागेल. तसेच, या व्यापीठांवरून सैनिकांना शासनावर कोणत्याही प्रकारची टीका करता येणार नाही, अशी बंधने घालण्यात आली आहेत.

केंद्र शासनाने तयार केलेल्या या नियमांचे पालन जर सैनिकांनी केले नाही, तर कारवाई होणार असल्याचेही संबंधित आदेशात सांगण्यात आले आहे. तसेच, “कुठल्याही खोट्या अकाउंटवरून माहिती देऊ नये. तसेच सरकारच्या धोरणांविरोधात वक्तव्य करू नये”, असंही जवानांना बजावण्यात आलं आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

याआधी जवानांच्या मोबाईमध्ये वरील अनुप्रयोग (अप्लिकेशन्स) आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पाकिस्तान आणि चीन हे सोशल मीडियाचा वापर करून पाळत ठेवत असल्याची काही प्रकरणे उघडकीस आल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. “सैनिक आणि अधिकाऱ्यांना फसवून, त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. हे अनुप्रयोग वापरणाऱ्याचा सगळा विदा (डेटा) आणि माहिती भारताबाहेर असलेल्या त्यांच्या सर्व्हररुमला पाठविण्यात येत असल्याचे उघड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला”, असे शासनाने म्हटले होते.

वाचा | कारगिल विजय दिन : अमर हुतात्म्यांची विजयगाथा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force) सध्या देशातली 63 विमानतळे, विविध संस्था, विविध सरकारी मंत्रालयांची कार्यालये यांची सुरक्षा व्यवस्था पाहाते. समाज माध्यमांच्या माध्यमातून महत्त्वाची आणि गुप्त माहिती बाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने शासनाने हा निर्णय घेतल्याचे आदेशात सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: