रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांसाठी २१ लाख राख्या!

शक्ती सन्मान सोहळा’ या उपक्रमच्या अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त राज्यभरातून मुख्यमंत्र्यांसाठी २१ लाख राख्या पाठवण्याचे कार्य जोमात सुरू आहे. 

 

ब्रेनविशेष | सागर बिसेन

१३ ऑगस्ट २०१९

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने चक्क २१ लाख पाठवण्यात येणार आहेत.  भाजप प्रदेश महिला मोर्चातर्फे शक्ती सन्मान सोहळ्यानिमित्त या राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘बंध बंधुत्त्वाचे, नाते विश्वासाचे ,प्रगतिशील महाराष्ट्राचे’ या उपक्रमाला दाद म्हणून राज्यभरातून राख्या पाठवण्यात येत आहेत.

शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त भाजपच्या कल्याणमधील चारही विधानसभा क्षेत्रातील महिलांकडून जास्तीत जास्त राख्यांचे संकलन केले जात आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्याचा संकल्प जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केला आहे. हे कार्यकर्ते व पदाधिकारी सर्वस्तरातील महिलांशी संपर्क साधून राख्यांचे संकलन करणार आहेत. हे राखी संकलनाचे काम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

या उपक्रमानिमित्ताने महिलांना एक मोबाइल नंबरही देण्यात येणार आहे. राखी व पत्र कार्यकर्त्याकडे दिल्यावर महिला या अभियानाशी जोडल्या जातील. राखी संकलनाचे काम पूर्ण  झाल्यावर१६ आगस्टला शक्ती सन्मान सोहळ्यानिमित्त षण्मुखानंद सभागृहात मुख्यमंत्र्यांना या राख्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास चारही विधानसभांच्या संयोजिका आणि सहसंयोजिका उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा. उज्वला दुसाने यांनी दिली. सोबतच, ज्यांना राखी प्रत्यक्ष पाठविता येणार नाही, त्यांनी वेबसाइटवर व्हर्चुअल राखी व संदेश पाठवावा, असे आवाहनही दुसाने यांनी केले आहे. lokmat.com

‘भाजपा, प्रवेश देणे सुरू आहे!’ ; राज्यभर फलकबाजी

● राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना पाठवल्या जाताहेत राख्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘बंध बंधुत्त्वाचे, नाते विश्वासाचे ,प्रगतिशील महाराष्ट्राचे’ या उपक्रमाच्या अंतर्गत रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘शक्ती सन्मान सोहळा २०१९’ आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाला दाद म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून भाजप कार्यकर्त्यांनी राखी संकलनाचे काम सुरू केले आहे. या उपक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल २१ लाख राख्या पाठवण्यात येणार आहेत. विविध जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या यानिमित्ताने पुढे आल्या असून राखी संकलनाचे कार्य करीत आहेत. या मोहिमेला ‘रक्षासूत्र योजना’ असेही नाव देण्यात आले असून, जुलै महिन्यापासूनच राखी संकलनाचे कार्य राज्यभरातून सुरू झाले आहे. विविध जिल्ह्यांत राबवल्या गेलेल्या भाजप सदस्यता मोहिम अंतर्गत  रक्षा सूत्राचाही प्रचार करण्यात आला व राज्यभरातील महिलांना मुख्यमंत्र्यांना राखी पाठवण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.

● कोणत्या जिल्ह्यातून किती राख्या ?

राज्यातील भाजपचे आमदार, स्थानिक भाजप कार्यकर्ते व महिला संघटना यांच्यातर्फे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांत शक्ती सन्मान सोहळा निमित्ताने राखी संकलनाचे काम करण्यात येत आहे. काही जिल्ह्यांत हे कार्य झाले असुन, स्थानिक नेत्यांनी संबंधित माहिती छायाचित्रांसह समाजमाध्यमांवर प्रकाशित (पोस्ट) केली आहे. त्यांतील माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे १ ते १० लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत.

– वर्धा विधानसभा क्षेत्रातून १ लाख राख्या संकलित करण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत केळझर, वर्धा. छायाचित्र : ट्विटर

– अकोला जिल्ह्यातून २१ हजार राख्या पाठवण्यात येणार आहेत.

– गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून ११ हजार राख्या पाठवण्यात आल्या आहेत.

गडचिरोली विधानसभा क्षेत्र.  स्तोत्र : gondwanatimes.in

– लासलगाव, नाशिक मधून १००० राख्या पाठवण्यात आल्या आहेत.

– नागपूरमधून २ लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत. Nagpurtoday

– याव्यतिरिक्त मुरबाड तालुका, तिवसा विधानसभा क्षेत्र, पालघर, नाशिक, पुणे व इतर जिल्ह्यांतील विधानसभा क्षेत्रातूनही मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवण्यात येत आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: