कोरोना संक्रमित अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत !

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पाकिस्तान आपले घाणेरडे हेतू साध्य करण्यासाठी एकही संधी सोडताना दिसत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी छावण्यांमध्ये दहशतवाद्यांनी कोरोना विषाणू पसरविणारे अतिरेकी (फिदाईन) तयार केले आहेत. या अतिरेक्यांद्वारे जास्तीत जास्त घुसखोरी करून सीमेपलीकडे असलेल्या या कोरोना-संक्रमित अतिरेक्यांना भारतात ढकलण्यास पाकिस्तानी सैन्य सतत प्रयत्नशील आहे, अशी माहिती मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने जून महिन्यात एलओसीवर 418 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) मध्ये 2500 हून अधिक पाकिस्तानी लष्करातील सैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर त्यामुळे जवळपास 53 जणांचा मृत्यू झाला. बर्‍याच दिवसांपासून पसरत चाललेल्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यात पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) मधील सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे तेथील तैनात लष्कराचे कर्मचारी आणि अधिकारी  यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

● पीओकेमधील दहशतवादी छावण्यांमध्ये कोरोना-संक्रमित अतिरेकी

वाढत्या कोरोना संक्रमणामुळे येथील सैन्यच नाही, तर सामान्य जनताही चिंतेत आहे. या विषाणूच्या संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथील स्थानिकांनी शासनाविरुध्द निदर्शनेही केली. तसेच, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून कोरोना संक्रमितांना पीओके आणि जीबीमध्ये उभारलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर,  कोरोना-संक्रमित अतिरेकी पीओकेमध्ये असलेल्या दहशतवादी छावण्यांमध्ये दहशतवादी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही देत असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, ऑपरेशन कमांडर्सनाही पाकिस्तानात बसलेल्या अतिरेक्यांनी एलओसी ओलांडून मोठ्या संख्येने कोरोना संक्रमित अतिरेक्यांना घुसखोरी करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी एका ध्वनिफितीमध्ये पाकिस्तानात दहशतवादी छावणीत बसलेला काश्मिरी दहशतवादी साजिदने आपल्या वडिलांना फोनवर सांगितले होते की, पाकिस्तानात बसलेले दहशतवादी आता कोरोनाला काश्मीरला पाठविण्याचा कट रचत आहेत. त्यांचे मालक संक्रमित दहशतवाद्यांना शक्य तितक्या लवकर काश्मीरमध्ये पाठविण्याच्या प्रयत्नात आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: