‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी योग्य शिफारशी सुचविण्यासाठी विशेष मृृत्यू विश्लेषण समिती गठीत करण्यात आली होती.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

ज्यांनी प्रकृती गंभीर आहे अशा कोरोनाबाधित रुग्णांवर मुख्य उपचारासोबतच योग्य पोषण, व्यायाम, आदी. सहाय्यक उपचार पद्धतींच्या वापरावर भर देणे आवश्यक असल्याचे शिफारस शासनाद्वारे गठीत मृत्यू विश्लेषण समितीने केली आहे. सोबतच, ‘कोव्हिड-१९‘मुळे होणाऱ्या मृत्यूदरास कमी करण्यासाठी काही सूचनाही समितीने मुंबई महापालिकेला केल्या आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत उपचाराधीन असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत असली, तरी मृत्यूंचे प्रमाण घटण्याचे काही चिन्ह सद्याप दिसू लागले नाहीत. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर अद्यापही ६ टक्केच्या आसपास असून, हा मृत्यूदर कमी करण्यासाठी योग्य शिफारशी सुचविण्यासाठी विशेष विश्लेषण समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार, मुंबईतील सुमारे पाच हजार ‘कोव्हिड-१९’ रुग्णांच्या स्थितीचा अभ्यास करून समितीने संबंधित अहवाल पालिकेला सादर केला आहे. यामध्ये, मुख्य उपचार पद्धतींसह योग्य पोषण आहार, व्यायाम, प्रोनिंग अशा सहाय्यक उपचार पद्धतींचाही अवलंब केला जावा अशी शिफारस समितीने केली आहे.

वाचा | लाखों मुंबईकरांना झाला कोरोना, पण कळलंच नाही !

कोरोना विषाणू बाधितांचे संभाव्य मृत्यू कमी करण्यासाठी औषधासह श्वसनासंबंधी विकार दूर करण्यासाठी फिजियोथेरपी, रुग्णाला योग्य पद्धतीने वळवून पोटावर झोपविणे (प्रोनिंग), योग्य वेळी योग्य प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा या सहायक थेरपींचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे रुग्णांची प्रकृती स्थिर होण्यास मदत होते. रुग्णांना खूप अशक्तपणा आल्याने पोषणावरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे”, असे अहवालात म्हटले आहे. या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचनाही समितीने पालिकेला केली आहे.

सोबतच, वरील शिफारशींसह समितीने आपल्या अहवालात सांगितले आहे की, रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्याला योग्य रुग्णालयात पाठविले जावे, औषधांचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा, मृत्युदर अधिक असणाऱ्या रुग्णालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या नियमावलीचा अभ्यास करून रुग्णांना मार्गदर्शन केले जावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: