अ. भा. अखाडा परिषदाध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या?

वृत्तसंस्था | एएनआय

ब्रेनवृत्त | प्रयागराज


अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (वय ७२ वर्षे) त्यांच्या प्रयागराज येथील बाघम्बरी मठात आज (सोमवारी) संध्याकाळी मृतावस्थेत आढळले. नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केली असल्याची शंका पोलिसांना आहे. अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या विशेष चमूने पुढील तपास सुरू केला आहे. 

पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासणीनंतर माध्यमांना प्राप्त माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी ज्या ठिकाणी मृतावस्थेत आढळले, त्या मठाचे दार आतून बंद होते आणि त्याला नंतर पोलिसांना तोडावे लागले. आतमध्ये नरेंद्र गिरी नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून असलेले आढळले. पोलिसांना घटनास्थळी एक आत्महत्या नोंदही  (सुसाईड नोट) सापडली आहे, जिच्यात ते मानसिकरित्या अस्वस्थ होते, असे नमूद आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रयागराज पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या आत्महत्या नोंदीत आंनद गिरी आणि नरेंद्र गिरी यांच्या काही शिष्यांच्या नावांचा उल्लेख आहे. ते अनेक कारणांमुळे दुःखी होते आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आयुष्याला संपवण्याचा निर्णय घेतला, असे नोटमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ७-८ पानी नोंदीत त्यांनी असेही म्हटले आहे, की ते त्यांचे संपूर्ण आयुष्य अभिमानाने जगले आणि आता पुढे त्या अभिमानाशिवाय ते पुढील आयुष्य जगू शकणार नाहीत. 

बाबा रामदेवांची ‘पतंजली झाली करमुक्त’ !

दुसरीकडे, ७२ वर्षीय नरेंद्र गिरी यांना एप्रिलमध्ये कोव्हिड-१९ ची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःला त्यांच्या आश्रमतच इतरांपासून वेगळे करून ठेवले होते.

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. “अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांनी स्वतःला अध्यात्मिक परंपरेत समर्पित करण्याबरोबरच विविध संत परंपरांना एकसूत्रात बांधण्याचे कार्य केले”, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटले आहे.

संत साहित्य अभ्यासक डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ श्रद्धांजली वाहताना म्हणतात, “अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे ब्रह्मलीन होणे म्हणजे अध्यात्मिक क्षेत्रातील कधीही न भरून निघणारी हानी आहे. प्रभू श्रीरामांना प्रार्थना आहे, की त्यांनी दिवंगत पुण्यात्माला आपल्या श्रीचरणी स्थान द्यावे तसेच शोकाकुल अनुसारकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी.”

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही महंत गिरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

 

सहभागी व्हा👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: