डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

संसदेच्या आर्थिक स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी पंतप्रधान व काँग्रेसचे जेष्ठ नेते मनमोहन सिंग यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी नवे सदस्य म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांची नियुक्ती केली.

संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी पंतप्रधान आणि जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे सदस्य असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्यासाठी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी नवे सदस्य म्हणून डॉ. मनमोहनसिंग परत एकदा नियुक्त केले आहे. तर, दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत ५ टक्के विकास दर समाधानकारक : मुख्य आर्थिक सल्लागार

याआधीही डॉ. सिंग हे संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य होते. सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे व राज्यसभेचे सदस्य होते. यावेळी अर्थविषयक स्थायी समितीपुढे नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. दोनदा पंतप्रधानपद भूषविलेले डॉ. मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते. यावर्षी ऑगस्टमध्ये पंजाबमधून पुन्हा राज्यसभेवर  निवडून आल्यानंतर त्यांची परत एकदा अर्थविषयक स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: