वैज्ञानिक नारायण मूर्ती यांच्या हाती ब्रह्मोसची धुरा!

वृत्तसंस्था | एएनआय

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) क्षेपणास्त्र व सामरिक प्रणालींचे महासंचालक (DGMSS) बीएचव्हिएस नारायण मूर्ती यांच्याकडे ब्रह्मोस अवकाश महामंडळाचा  (BrahMos Aerospace Corporation) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

“संस्थेतील प्रतिष्ठित वैज्ञानिक नारायण मूर्ती यांच्याकडे भारताच्या सशस्त्र दलांसाठी ब्रह्मोस हे  सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन करणाऱ्या ब्रह्मोस एरोस्पेस कॉर्पोरेशनच्या अंतरिम प्रमुखाचे कार्यभार सोपवण्यात आले आहे”, असे ब्रह्मोसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रह्मोसच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला माहिती देताना असेही सांगितले, की ही अंतरिम नियुक्ती असून, डिजीएमएसएस आधीपासूनच ब्रह्मोस अवकाश महामंडळ प्रा. लिमिटेडच्या संचालक मंडळात आहेत. 

सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून काल सुधीर मिश्रा हे महामंडळाच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर अंतरिम प्रमुख म्हणून मूर्ती यांची काल नियुक्ती करण्याचा मंगळवारी निर्णय घेण्यात आला.

नक्की वाचा 👉 आर हरी कुमार यांनी स्वीकारला नौदल प्रमुखाचा पदभार!

वैज्ञानिक नारायण मूर्ती यांच्याविषयी 

– नारायण मूर्ती हे क्षेपणास्त्रे व इतर संरक्षण विषयक उपकरणांच्या प्रगत उपयोजित संगणक तंत्रज्ञानानांचे (Advance Onboard Computer Technologies) मुख्य शिल्पकार आहेत.

– गेल्या तीन दशकांच्या कार्यकाळातील त्यांच्या शाश्वत योगदान व तंत्रज्ञानातील प्रतिनिधित्वामुळे देशाला संरक्षण तंत्रज्ञानातील अनेक बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे.

डीआरडीओद्वारे पिनाका अग्निबाणाच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी !

– रिअल टाइम एम्बडेड कम्प्युटर्स, संगणक प्रणाली अभियान आणि इतर अवकाशविषयक तंत्रज्ञान आदींमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

– ‘शक्ती अभियान’ अंतर्गत प्रगत एव्हीयोनीक्स, भारताच्या पहिल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी (A-SAT), लांब पल्ल्याच्या अग्नी-५ अभियान इत्यादींमध्ये संरचना व विकासासाठी प्रतिनिधित्व केले आहे. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: