डीआरडीओद्वारे पिनाका अग्निबाणाच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी !

ब्रेनवृत्त | चांदीपूर 


भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडिशाच्या चांदीपूर तटावरील एकात्मिक चाचणी केंद्रावरून काल दोन महत्त्वाच्या अग्निबाणांच्या सुधारित आवृत्तींची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. संस्थेद्वारे चाचणी करण्यात आलेल्या या अग्निबाणांमध्ये स्वदेशी बनावटीच्या १२२ मिमी कॅलिबर रॉकेटच्या वर्धित पल्याच्या आवृतीचा  व पिनाका अग्निबाणाच्या विस्तारित पल्ल्याच्या आवृत्तीचा समावेश आहे. 

“१२२ मिमी रॉकेटच्या वर्धित पल्ल्याच्या चार आवृत्तीची संपूर्ण आवश्यक साधनांसह यशस्वी चाचणी करण्यात आली, आणि त्यांनी अभियानाच्या संपूर्ण उद्दीष्टांची पूर्तता केली. हे अग्निबाण लष्कराच्या उपयोगासाठी विकसित केले असून, 40 किमी पर्यंतच्या लक्ष्यास ते नष्ट करू शकतात,” असे संरक्षण मंत्रालयाच्या संबंधित अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हे दोन्ही अग्निबाण बहुबॅरल अग्निबाण प्रक्षेपकद्वारे (MBRL- Multi-Barrel Rocket Launcher) प्रक्षेपित  करण्यात आले. 

छायाचित्र स्रोत : पीआयबी

सोबतच, पंचवीस वर्धित पिनाका अग्निबाणांची वेगवेगळ्या पल्ल्यांवर  (रेंज) असलेल्या लक्ष्यांच्याविरूद्ध एकामागून एक चाचणी करण्यात आली. या प्रक्षेपणांच्या दरम्यान अभियनाची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली गेली. पिनाका रॉकेट प्रणालीची वर्धित पल्ल्याची आवृत्ती 45 किमी अंतरावरील लक्ष्य नष्ट करू शकते.

आयटीआर, प्रूफ आणि प्रायोगिक आस्थापनेद्वारे (पीएक्सई) स्थापित टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टमद्वारे सर्व प्रक्षेपित उपकरणांचा मागोवा घेण्यात आला.

ब्रेनबिट्स । जाणून घ्या लढाऊ विमाने ‘सुखोई-३०एमकेआय’ व & ‘मिग-२९’ विषयी

पुणे येथील आयुध संशोधन व विकास आस्थापना (एआरडीई) आणि उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) यांनी संयुक्तपणे ही अग्निबाण प्रणाली विकसित केली आहे. यात नागपूरच्या मेसर्स इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडचे उत्पादन सहकार्य लाभले आहे.

पिनाका आणि 122 मिमी कॅलिबर रॉकेटच्या वर्धित आवृतींच्या यशस्वी चाचणीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि सहभागी उद्योगांचे अभिनंदन केले आहे.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: