राज्यातील ग्रामपंचायती-नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निश्चित!

ब्रेनवृत्त । मुंबई


विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या राज्यातील सुमारे ४,५०० ग्रामपंचातींच्या सदस्यांच्या निवडीसाठी लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. तब्बल ७ हजार १३० रिक्त पदांसाठी येत्या २१ डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (स्टेट इलेक्शन कमिशन) दिली आहे.

राज्यातील एकूण ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे जवळपास ७ हजार १३० सदस्यांचे पद रिक्त झाले आहेत. रिक्त झालेल्या यापदांवर नवीन सदस्य निवडण्यासाठी २१ डिसेंबरला राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, २२ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान

हेही वाचा । अखेर अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतीत रूपांतर!

दुसरीकडे, राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचेही नियोजन राज्य निवडणूक आयोगाने आखले आहे. राज्यातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील व 26 नोव्हेंबरपर्यंत हरकती-सूचना दाखल करता येतील, असे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. त्यानंतर 30 नोव्हेंबरला प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच तयार केल्या जाणार असून, यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातील. यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून बदललेला प्रभाग, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असेही मदान म्हणाले.

नक्की वाचा > राज्यात नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार मतदार जागृती अभियान!

> प्रभाग याद्या तयार होणाऱ्या नगरपंचायती

जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)

परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी

लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ

उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.

नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर

हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ

ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा

रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)

रत्नागिरी- मंडणगड, दापोली

सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे

पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित)

अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर

बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा

यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी

वाशीम- मानोरा, मालेगाव, नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर

वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर

भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर

गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी

चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही

गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड

सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी

सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महंकाळ

सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)

नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी

धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ

अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी

जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: