२०४०पर्यंत नवीन प्लास्टिक उत्पादन बंद करणे गरजेचे!

ब्रेनवृत्त । सागर  बिसेन


प्लास्टिक प्रदूषण आणि त्यामुळे पर्यावरणाला होणारी कधीही भरून न काढता येण्याजोग्या हानीविषयी आता संपूर्ण जग अवगत आहे.  या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी २०४० पर्यंत नवीन प्लास्टिकचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात यावे यासाठी वैश्विक स्तरावर कायदेशीररित्या बंधनकारक असलेला करार (legally binding agreement) करण्यात यावा अशी मागणी पर्यावरण शास्त्रज्ञांनी केली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र ;  स्रोत : nrdc.org

आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय कायद्यासाठीच्या केंद्रातील (CIEL : Centre for International Environmental Law) पर्यावरण अभ्यासक आणि तज्ज्ञांनी लिहिलेला एक अहवाल सायन्स नियतकालिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालात तज्ज्ञांनी सन २०४० पर्यंत जगभरात नवीन प्लास्टिक उत्पादन बंद करण्यात यावे यासाठी वैश्विक पातळीवर एक बंधनकारक करार असावा, अशी मागणी केली आहे. या अहवालात प्लास्टिकच्या मूलभूत घटकांच्या वेचनापासून प्लास्टिकच्या प्रदूषणापर्यंत असा प्लास्टिक्सच्या संपूर्ण जीवनचक्राचा आढावा घेण्यात आला आहे.

एकल वापर प्लास्टिक्सला हद्दपार करण्यासाठी परिपत्रकता नाविन्यतेचा (circularity innovation) अवलंब करण्यात यावा अशी मागणीही या अहवालातून  आली आहे.  विशेष म्हणजे, जे गुणधर्म प्लास्टिक्सला उपयोगिता प्रदान करतात, तेच गुणधर्म पर्यावरणाच्या हानीला सर्वाधिक घातक ठरतात, असे अहवालात नमूद केले आहे. १९५० च्या दशकापासून  जगभरात ८ बिलियन टन प्लास्टिक्सचे उत्पादन झाले आहे.

नक्की वाचा । समुद्री माशांमध्ये प्लास्टिकचे अंश ; टेरीचे विशेष अभियान !

> प्लास्टिक प्रदूषणाची भयावह स्थिती 

प्लास्टिकचा कचऱ्याचा सर्वाधिक (४७%) हिस्सा अविष्टीकरण पदार्थांचा (पॅकेजिंग मटेरिअल्स) आहे. कापड आणि परिवहनातून प्रत्येकी १४% व ६% प्लास्टिक कचरा निर्माण होतो. दुसरीकडे,  दरवर्षी जगभरात निर्माण होणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा ३% भाग समुद्रात जाऊन साचतो आणि समुद्राच्या परिसंस्थेला बाधित करतो. सन २०१०मध्ये समुद्रात साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण तब्बल ८० लाख टन इतके होते. 

छायाचित्र स्रोत : dw.com

दुसरीकडे, प्लास्टिक प्रदूषणाची इतकी भयावह स्थिती असतानाही २०१९ मध्ये तब्बल ३६ कोटी ८० लाख टन नवीन प्लास्टिकचे उत्पादन झाले. संबंधित अहवालातील माहितीनुसार, सन २०५० पर्यंत जगभरातील संग्रहण भूमीवर (लँडफिल्स) किंवा नैसर्गिक पर्यावरणात जवळपास १२,००० मिलियन टन प्लास्टिक कचरा जमा झालेला असेल.

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: