मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेत ३० सप्टेंबरपर्यंत वाढ

 ब्रेनवृत्त, नवी दिल्ली 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहनविषयक कागदपत्रांच्या वैधतेची मुदत सप्टेंबरपर्यंत आणखी वाढवली आहे. त्यानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना सूचनावली जारी केली आहे. या आधी मंत्रालयाने ३० मार्चला मुदतवाढ करून ३० जून केली होती.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 30 मार्च 2020 ला सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना सूचना प्रसारित करून स्वस्थता, परवाने (सर्व प्रकारचे), चालक परवाना, नोंदणी व इतर कोणतीही कागदपत्रे ज्यांच्या वैधतेची मुदत टाळेबंदीमुळे वाढवता आली नाही किंवा वाढवता येऊ शकत नाही, तसेच ही मुदत 1 फेब्रुवारी 2020 पासून समाप्त झाली आहे किंवा 31 मे 2020 ला संपत आहे, अशी कागदपत्रे 31 मे 2020 पर्यंत अंमलबजावणीसाठी वैध मानली जातील आणि ही कागदपत्रे 30 जून 2020 पर्यंत वैध मानावीत, अशा सूचना अंमलबजावणी अधिकाऱ्याना दिल्या होत्या.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

दरम्यान, ‘कोव्हिड-१९’चा प्रसार रोखण्यासंदर्भातली परिस्थिती अद्याप सुरू असल्याचे लक्षात घेऊन आणि यासंदर्भातली प्राप्त विनंत्या लक्षात घेऊन ही मुदत वाढवून सर्व कागदपत्रे अंमलबजावणी संदर्भात 30 सप्टेंबरपर्यंत वैध मानावीत, अशा सूचना गडकरी यांनी मंत्रालयाला दिल्या आहेत.

‘कोव्हिड-१९’च्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 21 मे 2020 ला अधिसूचना जारी करून ‘केंद्रीय मोटार वाहन नियम,1989’च्या नियम 32 अथवा नियम ८१ अंतर्गत शुल्क वैधता किंवा अतिरिक्त शुल्क 31 जुलै2020 पर्यंत शिथिल केले आहे. कोव्हिड-१९च्या अभूतपूर्व परिस्थितीत दिलासा देण्यासाठी परवाना आवश्यकता, कर, नूतनीकरणासाठी शुल्क, परवान्यासाठी दंड, याबाबत शिथिलता देण्याच्या दृष्टीने ‘मोटार वाहन कायदा, 1989’ अंतर्गत किंवा इतर कायद्यातल्या इतर अशा तरतुदींचा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी विचार करावा, अशी विनंती आता करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: