तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

ब्रेनवृत्त | भंडारा

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेताचे तात्काळ पंचनामे करावे, तसेच तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धान खरेदी पूर्व तयारीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने सुमारे १३ हजार शेतकऱ्यांचे ६ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृ‍षी विभागाचा अंदाज आहे. सोबतच, तुडतुडा व खोडकीड या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.

सत्तासंघर्षाच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात ३०० शेतकरी आत्महत्या!

या आढावा बैठकीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद्र हेडाऊ, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर आदी. उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी, तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

(संदर्भ : महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: