इन्फोसिसच्या सीईओला अर्थमंत्र्यांसमोर हजर राहण्याचे आदेश; द्यावे लागेल स्पष्टीकरण!

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


देशाच्या अर्थ मंत्रालयाने इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश (समन्स) दिले आहेत. प्राप्तिकर भरण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ई-व्यासपीठात (e-filing portal) कित्येक दिवसांपासून तांत्रिक त्रुटी कायम असण्याच्या कारणावरून मंत्रालय त्यांना जाब विचारणार आहे.

जवळपास ३० बिलियन डॉलर्सहून अधिकची संपत्ती असणारे इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना स्वतः २३ ऑगस्ट रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या समक्ष राहण्याचा आदेश देण्यात आला. “नवीन प्राप्तिकर भरणा ई-व्यासपीठ सुरू होऊन अडीच महिने झाले, तरी त्यातील तांत्रिक त्रुटी अद्याप का सोडवल्या गेल्या नाहीत”, या प्रश्नावर पारेख यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. 

वाचा । बाबा रामदेवांची पतंजली झाली ‘करमुक्त’!

फक्त तांत्रिक त्रुटीच नव्हेत, तर २१ ऑगस्टपासून प्राप्तिकर भरणाचे नवे व्यासपीठ (पोर्टल) पूर्णपणे ठप्प झाले असून, ते आताही निष्क्रिय असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

संघ अर्थ मंत्रालयद्वारे ७ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने प्राप्तिकर भरण्यासाठी नवे व सुधारित ई-व्यासपीठ (e-portal) जाहीर करण्यात आले. परंतु, तेव्हापासून या पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून येत आहेत. यामुळे अनेक कर भरणाऱ्यांना, कर व्यवसायीकांना व इतर भागधारकांना या अडचणींचा सामना अद्यापही करावा लागत आहे.

याआधी, समाजमाध्यमांवरून समोर आलेल्या तक्रारी लक्षात घेत अर्थमंत्र्यांनी संकेतस्थळ विकासक इन्फोसिसला याबाबत सुचवले होते. परंतु, पोर्टवरील त्रुटी तरीही कायमच असल्यामुळे आता मंत्रालयाने थेट इन्फोसिसच्या सीईओलाच स्पष्टीकरण मागितले.

 

सहभागी व्हा –> मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: