फोर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत अर्थमंत्री सीतारामन!

पीटीआय, न्यूयॉर्क

फोर्ब्स नियतकालिकेद्वारे प्रकाशित आलेल्या यंदाच्या जगातील शंभर सर्वांत प्रभावी महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला आहे. या शंभर महिलांच्या यादीत जर्मनीच्या पंतप्रधान अँजेेला मर्केल सलग नवव्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. सीतारामन यांच्या व्यतिरिक्त एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांचा समावेश आहे.

फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘दि वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या २०१९ सालच्या जगभरातील प्रभावी महिलांच्या यादीत अँजेला मर्केल प्रथम स्थानी आहेत. सलग नव्यांदा त्याने या यादीत पाहिले स्थान मिळवले आहे. युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तीना लॅगार्ड व अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेेख हसिना २९ व्या क्रमांकावर आहेत. या यादीत तीन भारतीय महिलांंचा समावेश असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३४व्या क्रमांकावर आहेत. त्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत, याआधी  त्यांनी संंरक्षण खातेही सांभाळले आहे.

विकास दर कमी, मात्र देशात आर्थिक मंदी : अर्थमंत्री सीतारामन

सीतारामन यांच्या व्यतिरिक्त रोशनी नादर मल्होत्रा आणि किरण मजुमदार शॉ या अनुक्रमे ५४ आणि ६५व्या क्रमांकावर आहेत. मल्होत्रा एचसीएल ८.९ अब्ज डॉलर्स च्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर, मजुमदार शॉ या बायोकॉन कंपनीच्या संस्थापक असून त्या देशातल्या सर्वांत आघाडीच्या स्वयंश्रीमंत महिला आहेत. संशोधन व पायाभूत व्यवस्था यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली असून, १९७८ साली बायोकॉनची स्थापना केली.

“२०१९ मध्ये जगभरात अनेक महिलांनी भक्कम निर्णय घेतले आहेत, देशांच्या शासनदारी प्रतिनिधित्व मिळवले आहे, तसेच माध्यमं, समाजकारण आणि व्यवसायातही आपला ठसा उमटवला आहे”, असे फोर्ब्सने ही यादीत म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार प्रदान

जेष्ठ पत्रकार रवीश कुमार रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी

फोर्ब्सच्या जगभरातील शंभर प्रभावशाली महिलांच्या या यादीत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहकरी अध्यक्ष मेलिंडा गेट्स (६), आयबीएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गिन्नी रोमॅटि (९), गायिका रेहाना (६१), बियोंसे (६६) व टेलर स्विफ्ट (७१), तसेच टेनिसपटू सेरेना विलीयम्स(८१) व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग (१००) यांचाही समावेश आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: