फ्रान्स-रशियामध्ये पुन्हा वाढतोय कोरोना!
मराठी ब्रेन ऑनलाईन
ब्रेनवृत्त । पॅरिस
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू आजाराचा जोर कमी झाला असल्याचे दिसत असले, तरी जगातील काही मोठ्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे संकेत दिसत आहे. फ्रान्समध्येही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुसरीकडे, सर्वांत मोठा देश असलेल्या रशियामध्येही प्रति दिवशी दगावणाऱ्या कोव्हिड-१९ बाधितांची संख्या वाढली आहे.
फ्रांस, रशिया यांसारख्या मोठी अर्थव्यस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा परत वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेच वातावरण तयार होताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, रशियातही कोरोना विषाणू संसर्गात कमालीची वाढ बघायला मिळत आहे.
हेही वाचा । कोव्हिड-१९ उगमाच्या पुनर्तपासाला चीनचा नकार!
रशियात ह्या सोमवारी एकाच दिवशी १,०१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. कोव्हिड-१९ महासाथीचा आजार पुन्हा सुरू झाल्यापासूनचा रशियातील हा मृतकांचा उच्चांकी आकडा आहे. देशातील कोरोनामुळे गेलेल्या बळींची एकूण संख्या २ लाख २५ हजार ३२५ इतकी झाली आहे. तर फ्रान्समधील मृतकांचा आकडा १ लाख १८ हजारांच्या वर पोहचला आहे.
रशियात अजूनही कोव्हिड -१९ लसीकरणाने पाहिजे तेवढ्या प्रमाणात वेग पकडलेलानाही आणि तेथील शासन निर्बंध अधिक कडक करण्यासही तयार नाही. देशातील १४.६० कोटी नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर ३६% लोकांना लसीची पहिली घुटी मिळाली आहे. त्यामुळे लॉकडाउन केले जाणार नसल्याचेही रशियाने जाहीर केले आहे. फ्रान्समध्ये ७९% लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीत तसेच मृतकांच्या आकडेवारीत जगात अमेरिका आणि भारत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in