‘मैत्री’ जणू सुखच !

मराठीब्रेन साहित्य

१४ डिसेंबर, २०१८

‘मैत्री’ हा शब्द जणू मानवी जीवनात आनंदाचे व सुखाचे क्षण भरण्याचे काम करतो. मैत्री माणसाच्या आयुष्यात गोडवा भरते. रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचं आणि आपुलकीचं नातं म्हणजे ‘मैत्री’. अशा कितीतरी  मैत्रीच्या व्याख्या आपल्याला करता येतील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात वेळ कसं निघुन जातं कळतच नाही. ज्याला मित्रमैत्रिणींचा सहवास लाभला त्याच्यासारखा सुखी कोणी नाही. मनातलं दुःख कमी करण्याचं ‘विद्यालय’ म्हणजे जणू मैत्रीच.

मनात कितीही राग असला, तरीही मित्रांच्या सहवासात त्या रागाला हास्यात रूपांतर करण्याची एक वेगळीच कला मित्रांच्या सानिध्यात अवगत होते. मित्र आणि मैत्रिणींची एकदा मैफल भरली की, आपल्याला अवघं जग नकोसं वाटून फक्त मित्रांची साथ कायमची हवी असते. त्यातही हक्काने रागावणाऱ्या आणि कोवळ्या फुलाप्रमाणे मैत्रीला जपणाऱ्या व्यक्ती सोबत असतील, तर आपल्याला   कल्पनाच करता येत नाही इतकी मजा असते.

आपण कधीतरी एकांतात बसलेलो असणार अथवा आपल्या शाळकरी मित्रांच्या अनुपस्थितीत कधीतरी शाळेत गेले असणार, तर आपण कल्पना करु शकतो की जीवनात मित्रांच्या अनुपस्थितीत कीती एकटेपणा जाणवतो. मग, जर आयुष्यात मित्रच् नसते तर. हा विचारच करणे अवघड आहे! नाही का?

आई-वडिलांविना पोरक्या असलेल्या मुलाला ज्याप्रमाणे एकांताचे चटके सहन करावे लागतात, अगदी त्याप्रमाणे मानवी जीवनात मित्रांच्या अनुपस्थितीचे चटके सहन करावे लागतात. मित्र बनवण्यासाठी बालकांमधे हळहळ आणि वृद्धामधे नैराश्य निर्माण होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो, की मला माझ्या आजपर्यंतच्या जीवनात मित्रांची कधी कमी पडली नाही. मला मिळालेल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहून ‘रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नातं म्हणजे मैत्री…’ या उक्तीवर कायमचा विश्वास बसला आहे. पण असे नाते जेव्हा काळाच्या ओघात दुभागले जातात ना, त्यावेळी मात्र ज्याप्रमाणे समुद्र मोठमोठ्याने खळखळून नंतर अचानक निस्तब्ध होतो, अगदी त्याचप्रमाणे आपणही निशब्द होऊन जातो.

स्रोत : गुगल

शेवटी, निसर्गाचं नियमच आहे ते, जे मिळालं ते एक दिवस जाणारच. पण मित्रत्वाच्या आठवणी मात्र कायमच्या मनात घर करुण राहतात. वेळोवेळी जुने दिवस आठवतात. एक प्रवास मैत्रीचा, जसा हळुवार पावसाच्या सरींचा. ती पावसाची सर अलगद येऊन जाते आणि एका सुंदरशा मैत्रीची आठवण हळूच करून देते. आणि मग हळूच ओळी ओठावर येतात…

“आयुष्याच्या या वाटेवर,

मैत्रीचा गारवा प्रत्येकक्षणी।

मित्र-मैत्रिणींच्या आठवणी,

कायमच्या असतील मनी।।”

सांजवेळी एकांतात बसल्यावर मनात सहज कल्पना येते की, ‘मैत्री’ या शब्दातच जणू स्वर्ग असावे आणि तसा भास मला कळकळीने होत असतो.

 

लेख : देवेंद्र रहांगडाले

कमरगाव, ता. गोरेगाव

जि. गोंदिया, महाराष्ट्र

भ्र. क्र. ७०३०५४३०९६

ईमेल: devendrarahangdale67@gmail.com

 

◆◆◆

 

(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, इथे प्रकाशित होणाऱ्या लेखांशी व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

 

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: