जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जी. सी. मुर्मु यांचा राजीनामा स्वीकारला असून, लवकरच त्यांची नियुक्ती देशाच्या महालेखापालपदी होणार असल्याची शक्यता आहे. 

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली 

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मु यांनी उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यापासून बरोबर एक वर्ष मुर्मु यांनी उपराज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जी. सी. मुर्मु यांचा राजीनामा स्वीकारला असून, लवकरच त्यांची नियुक्ती देशाच्या महालेखापालपदी होणार असल्याची शक्यता आहे.

उपराज्यपाल जी. सी. मुर्मु यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती भवनाने जाहीर केलेल्या परिपत्रकातून मुर्मु यांच्या जागी जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. “श्री मुर्मु यांच्या राहिनाम्यानंतर जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून मनोज सिन्हा यांनी नियुक्ती करताना राष्ट्रपतींना आनंद होत आहे”, असे राष्ट्रपती भवनाद्वारे प्रकाशित परिपत्रकात म्हटले आहे.

आयएएस गणेश चंद्र मुर्मु (संग्रहित छायाचित्र)

मनोज सिन्हा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मंत्रिमंडळात केंद्रीय दूरसंचार मंत्री व रेल्वेे राज्यमंत्री पद सांभाळले आहे. आता ते जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे नवे उपराज्यपाल असतील.

कारगिल विजय दिन : अमर हुतात्म्यांची विजयगाथा

दरम्यान, एका राष्ट्रीय वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय प्रशासकीय सेवेेेचे अधिकारी असलेले मुर्मु यांची देशाचे महानियंत्रक व महालेखापाल (CAG : Comptroller and Auditor General) पदी नियुक्ती होणार आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित नियुुक्तीपत्र शासनाकडून जाहीर केले जाईल. ते विद्यमान कॅग राजीव मेहरिषी यांंची जागा घेेेतील.

गेल्या काही आठवड्यांपासून केंद्राविषयी असलेल्या काही वरकरणी असहमतींवरून जी. सी. मुर्मु वादाच्या भोवऱ्यात आहेत. मुख्यत्त्वाने गेल्या काही दिवसांपूर्वी,  जम्मू-काश्मीर खोऱ्यात ४जी आंतरजाल सेवा पूर्ववत करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले होते. यावरून सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. दुसरीकडे, भारतीय निवडणूक आयोगाविषयी असहमती दर्शवत, “निवडणूक आयोगाने नियमानुसार आधी केंद्रशासित प्रदेशाचे परिसिमन करावे व नंतर निवडणूक घ्याव्यात”, असे मुर्मु म्हणाले होते. यावेळी, आयोगाने तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले होते की, केंद्रशासित प्रदेशात निवडणूक कधी घ्याव्यात याविषयी प्रतिक्रिया देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही.

वाचा  : राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी मनीषा म्हैसकर

● गिरीश चंद्र मुर्मु (G. C. Murmu)

गिरीश चंद्र मुर्मु हे  १९८५ च्या तुकडीचे गुजरात कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांनी दिल्ली व गांधीनगरमध्ये जवळून काम केले आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन होऊन दोन जम्मू व काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाल्यानंतर मुर्मु यांची जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्याआधी ते देशाच्या खर्च सचिवपदी (Secretary-Expenditure) कार्यरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: