Site icon MarathiBrain.in

त्या फुटलेल्या आमदारांना भाजपचे मंत्रीपदही ?

वृत्तसंस्था, पणजी

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व सोडलेल्या दहा आमदारांनी काल दिल्लीत जाऊन भाजपचे सदस्यत्व घेऊन पक्षप्रवेश केला. या दहापैकी बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज या चार आमदारांचा येत्या दोन दिवसांत मंत्री म्हणून शोथविधीही होणार आहे.

काँग्रेस सोडलेल्या गोव्याच्या दहा आमदारांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला

गोव्याचे आमदार बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राष्ट्रीय काँग्रेसचे दहा आमदार फुटले आणि भाजपमध्ये शिरले. यांमुळे काँग्रेस विधिमंडळ गटाचा सुमारे एक तृतीयांश गट भाजपात विलीन झाला. विधिमंडळ खात्याने हे विलीनीकरण झाल्याची जाहीर अधिसूचनाही काल जारी केली. राज्यातील काँग्रेसचे आमदार पक्षबाहेर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. पक्ष सोडलेल्या या आमदारांनी काल थेट दिल्ली गाठली आणि भाजपचे सदस्यपद स्वीकारले. त्यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि वरिष्ठ नेते जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या आमदारांपैकी चार जणांचा मंत्री म्हणून लवकरच शपथविधीही होणार आल्याच्या चर्चा आहेत. कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आज मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल असेेही म्हटले जात आहे. यासाठ प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची गुरुवारी दिल्लीत शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदार कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दुसरीकडे, मंत्रिमंडळातून वगळल्यापासून मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली आहे.

या सर्व घडामोडीदरम्यान काँग्रेसचे गोवा निरीक्षक चेल्लाकुमार गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी उरलेल्या पाच आमदारांसोबत चर्चा करुन राजकीय परिस्थितीतीचा आढावा घेतला. काँग्रेस विधीमंडळ नेता निवडीबरोबरच काँग्रेस सोडून गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. काँग्रेसचे पाचच आमदार राहिल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागणार

◆◆◆

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Exit mobile version