अनेक वर्षांपासून फरार नक्षलवाद्याला गोंदिया पोलिसांद्वारे अटक

गेल्या अनेेेक वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अखेर गोंदिया पोलिसांनी मोठ्या युक्तीने छत्तीसगड राज्यातून अटक केली आहे. नक्षलवाद्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 12 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

ब्रेनवृत्त | गोंदिया

जवळपास 10 वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अखेर गोंदिया पोलिसांनी मोठ्या युक्तीने छत्तीसगढ राज्यातून अटक केली आहे. या जहाल नक्षलवाद्याचे नाव रमेश मडावी असे असून, त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 12 लाख रुपयांचे बक्षीसदेखील जाहीर केले होते.

जहाल नक्षलवादी रमेश छत्तीसगड राज्याच्या सुकमा जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळताच गोंदिया पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. गोंदिया जिल्ह्यात अनेक मोठ्या नक्षली घटना घडवून आणण्यात त्याचा सहभाग होता. १९९७-९८ मध्ये नक्षल दलात सामील झालेल्या रमेशची देवरी नक्षल दलममध्ये एसी एम एल ओ एस कमांडर म्हणून देखील वर्णी लागली होती .

देवरी दलममध्ये असताना रमेशने पोलिस स्टेशन चिचगड अंतर्गत येणाऱ्या मगरडोह हद्दीमध्ये पोलिस पथकावर प्राण घातक हल्ला देखील केला होता. तसेच या परिसरात हत्या, गावकऱ्यांवर हल्ले चढविणे, सार्वजनिक मालमतेची नासधूस करणे अशा विविध घटनांमध्ये रमेशचा सहभाग होता. त्याच्यावर आधीच 13 गुन्हे दाखल आहेत. अखेर गोंदिया पोलिसांना या जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात यश आले आहे.

साप्ताहिक सदर | ‘शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव’ – भाग २

दुसरीकडे, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली पोलीस स्थानकाची नक्षल्यांद्वारे टेहळणी केली जात असल्याची माहितीही समोर येत आहे. जमिनीवरील सदृश वस्तूंचे व पोलीस स्थानकाच्या आवारातील ठिकाणांची ड्रोन सारख्या साधनांच्या वापराने टेहळणी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, संबंधित यंत्र ड्रोनच आहेत की अजून काही, याची अद्याप खात्री नाही.

Join Marathibrain

तुमच्या परिसरातील घडामोडी व उपक्रमांविषयी  प्रकाशित करण्यासाठी ई-मेल करा writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: