अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना

राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची, प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची, प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून, यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल निर्देश दिले होते.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ही समिती अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस प्राधान्य देऊन राज्याचे सर्वसमावेशक ऊर्जा धोरण तयार करेल व शासनास संबंधित शिफारशी करेल. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी भू बँक (लँड बँक) तयार करण्यात येणार आहे. यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश व राजस्थान या शेजारील राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांचा अभ्यासही केला जाणार आहे.

दरम्यान, लँड बँक तयार करण्यासाठी लवकरच एका कंपनीची स्थापना करण्यात येणार असून, तिची संरचना व कार्यप्रणाली या बाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी व त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी योजना (Single Window Scheme) राबविण्यात येणार आहे.

वाचा : सौरऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी

समितीची रचना

महावितरण, महापारेषण व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच महाऊर्जाचे  महासंचालक हे या उच्चस्तरीय समितीचे सदस्य राहणार असून ऊर्जा विभागाचे उपसचिव किंवा सहसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: